भारतात २१ सप्टेंबरपासून सुरू होणार Oppo F17 चा सेल; मिळणार ‘या’ ऑफर्स

जाणून घ्या, Oppo F17 चा सेलमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या ऑफर्स

Oppo F17 ची विक्री 21 सप्टेंबरपासून भारतात सुरू होणार असून प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरू केली जात आहे. हा फोन या महिन्याच्या सुरुवातीला Oppo F17 Pro सह लाँच करण्यात आला होता. लाँचदरम्यान कंपनीने Oppo F17 Pro ची किंमत आणि उपलब्धता या संदर्भात माहिती दिली होती. Oppo F17 बद्दलची माहिती उपलब्ध करुन नव्हती मात्र आता Oppo ने त्याची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती दिली असून दोन रॅम + स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे.

Oppo F17 च्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 17,990 रुपये आहे तर 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19,990 रुपये आहे. क्लासिक सिल्वर, डायनॅमिक ऑरेंज और नेव्ही ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक हा फोन खरेदी करू शकतील. 21 सप्टेंबरपासून हा फोन प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून ग्राहकांना खरेदी करता येईल. Oppo F17 या फोनसह ग्राहकांना बर्‍याच ऑफर्सही मिळणार असून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील नो कॉस्ट ईएमआय योजनांचा ग्राहक लाभ मिळणार आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड्सवरही ग्राहकांना 1,500 रुपयांची सूट देखील मिळणार आहे.

ऑफलाइन फोन खरेदी करणाऱ्या आयसीआयसीआय, फेडरल बँक आणि बँक ऑफ बडोदा क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही 7.5 टक्के कॅशबॅक मिळणार असून येथेही ग्राहकांना नो-कॉस्ट EMI योजनांचा लाभ मिळणार आहे. या सर्व व्यतिरिक्त, ग्राहकांना 500 रुपयांच्या सवलतीनंतर Enco W51 TWS इअरबड्स 4,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.


तब्बल 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत