Oppo चा नवीन ‘F9 Pro’ सेल्फी फोन, पाहा फिचर्स

सेल्फी प्रेमी Oppo F9 Pro फोनला भरभरुन पसंती देतील, अशी खात्री Oppo कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.

Oppo F9 pro
मोबाईल निर्मिती करणाऱ्या ‘ओप्पो’ कपंनीने Oppo F9 Pro हा नवीन स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. हा फोन खास सेल्फीप्रेमींसाठी असल्याचं ओप्पोचं म्हणणं आहे. तब्बल २५ मेगापिक्सल्चा फ्रंट (सेल्फी) कॅमेरा असलेला हा F9 Pro सेल्फी प्रेमींचे लक्ष वेधून घेईल यात शंकाच नाही. आजच्या सेल्फीच्या जमान्यामध्ये खास प्रेमींना डोळ्यासमोर ठेवून हा खास स्मार्टफोन बनवला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय F9 Pro मध्ये LED फ्लॅश लाईट आणि एआय ब्युटिफिकेशन २.१ या फिचर्सचा देखील समावेश आहे. याशिवाय एआर स्टिकर्स, स्लोमोशन व्हिडिओ आणि सीन डिटेक्शन आदी फिचर्सचाही या ‘सेल्फी फोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान सेल्फी प्रेमी या फोनला भरभरुन पसंती देतील अशी खात्री Oppo कंपनीकडून व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे अन्य फिचर्स.

हेही वाचा : Oppo A5 भारतामध्ये लाँच, पाहा फिचर

Oppo F9 Pro चे ठळक फिचर्स :

  • फोनला दोन बॅक कॅमेरे असून, त्यातील एक कॅमेरा 16 मेगापिक्सल तर दुसरा 2 मेगापिक्सलचा
  • यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम प्रकारातील आहे
  • 6.3 इंच आकारमानाचा HD डिस्प्ले, 6 GB रॅम
  • इनबिल्ट मेमरी 64 GB तर एक्स्पांडेबल मेमरी 256 GB
  • 3 हजार 500 MAH क्षमतेची बॅटरी (35 मिनिटांत 75 टक्के बॅटरी चार्ज होत असल्याचा दावा)
  • फोनची किंमत – २३ हजार ९९० रुपये

हेही वाचा : इन्स्टाग्राम अकाउंट अशी मिळवा ब्लू टिक