घरटेक-वेकOppo R17 Pro आज होणार लाँच; पाहा फिचर्स

Oppo R17 Pro आज होणार लाँच; पाहा फिचर्स

Subscribe

तज्ज्ञांच्या मते, Oppo R17 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारात OnePlus 6T ला टक्कर देऊ शकतो.

स्मार्टफोनची निर्मती करणाऱ्या Oppo या चिनी कंपनीचा ‘Oppo R17 Pro’ हा नवीन प्रिमिअम स्मार्टफोन, आज भारतामध्ये लाँच होणार आहे. जागतिक बाजारामध्ये हा फोन कंपनीने याआधीच लाँच केला होता. ‘Oppo R17 Pro’ हा कंपनीच्या R सिरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे जो भारतामध्ये लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन नुकतीच यासंबंधीची अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, टेक्नॉलॉजीच्या जगातील तज्ज्ञांच्या मते, Oppo R17 Pro या स्मार्टफोन्सची बहुतांशी फिचर्स ही OnePlus 6T या स्मार्टफोनशी मिळती जुळती आहेत. त्यामुळे Oppo कंपनीचा हा नवा स्मार्टफोन OnePlus 6T ला टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे. जाणून घेऊयात, नेमकी काय आहेत Oppo R17 Pro ची फिचर्स…

Oppo R17 Pro चे संभाव्य फिचर्स

या फोनला ६.४ इंचाचा फुल एचडी डिस्पले दिला असण्याची शक्यता आहे. डिस्प्लेता आस्पेक्ट रेशो १९.५:९ आणि स्क्रीन टू बॉडी रेशो- ९१.५ टक्के असू शकतो. या फोनच्या काही प्रमुख फिचर्सविषयी बोलायचं झालं तर, यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वाटरड्रॉप नॉचची सोय असू शकते. याशिवाय फोनच्या स्क्रिनला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिलेली असू शकते. फोनमध्ये ६GB रॅम आणि १२८जीबी इंटरनल मेमरी असू शकते. याशिवाय फोनमध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला असू शकतो. फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही असू शकतो.

- Advertisement -

फोनच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास यामध्ये स्पॅनड्रॅगन क्वॉलकॉम ७१० चिपसेट प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फोनच्या कॅमेरांमध्ये १२+२० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि सेन्सर डेप्थसह तिसरा रिअर कॅमेरा दिला असण्याची शक्यता आहे. याशिवाय फोनला २५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तर फोनची बॅटरी क्षमता ३ हजार ७०० एमएच क्षमतेची असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकंदरच ‘Oppo R17 Pro’ या फोनमधील बरेचसे फिचर्स हे OnePlus 6T या फोनशी साधर्म्य असणारे आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात ओप्पोचा हा नवा फोन वन प्लसला टक्कर देणार का? तसंच भारतीय ग्राहकांची या फोनला कितपत पसंती मिळणार, हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -