घरटेक-वेकरेसिंग टायर की म्युझिक स्पीकर!

रेसिंग टायर की म्युझिक स्पीकर!

Subscribe

गॅजेट प्रेमी आणि विशेषत: म्युझिकची आवड असलेल्यांना हा पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकर नक्कीच आवडेल!

गॅजेट्स विश्वामध्ये नेहमीच नवनवीन शोध लागत असतात. जगभरातील गॅजेट निर्मिती करणाऱ्या कंपन्या अत्याधुनिक आणि लोकोपयोगी गॅजेट्सची वारंवार निर्मिती करत असतात. मात्र, आता या स्पर्धेत चक्क ‘पिरेल्ली डिझाईन्स’ ही टायर बनवणारी कंपनीही उतरल्याचं दिसतंय. पिरेल्ली कंपनीने नुकतीच एका भन्नाट गॅजेटची निर्मिती केली आहे. F1 रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या टायरच्या आकाराचा एक ब्लूटूथ स्पिकर या कंपनीने बनवला आहे. पी झीरो साऊंड असं या ब्लूटूथ स्पीकरचं नाव असून, टायरच्या आकारातला हा स्पिकर सध्या गॅजेट प्रेमींचं लक्ष वेधून घेतो आहे. हा स्पीकर हुबेहूब फॉर्म्युला वन कारच्या रेसिंग व्हीलसारखा दिसतो. स्पिकरच्या आकाराप्रमाणेच त्यातील फिचर्सही तितकेच भन्नाट आहेत. चला घेऊया, पी झीरो साऊंड स्पिकरमधील फिचर्सचा आढावा…

‘पी झिरो साउंड’ स्पिकरची वैशिष्ट्य

  • स्पिकरचे वजन ९.५६ किलोग्रॅम तर सायका १२.९ इंच
  • १०० वॉटचे अम्पलिफायर्स
  • ब्लूटूथ ४.० च्या सहाय्याने स्मार्टफोन/ टॅबलेटशी जोडण्याची सुविधा
  • चांगल्या bazz साठी स्पिकरमध्ये १०० mm आकाराचा मिड सायका वूफर
Pirelli F1 tire shaped Bluetooth speaker
सौजन्य- सोशल मीडिया

पोर्टेबल स्पीकर

पी झिरो स्पिकरचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची पोर्टेबिलिटी. पी झिरो हा ब्लूटूथ स्पिकर असल्यामुळे त्याला प्लग कनेक्शनची मर्यादा नाही. तुम्ही कुठेही आणि कधीही या स्पिकरचा आनंद घेऊ शकता. तसंच आकाराला आणि वजनाला आटोपशीर असल्यामुळे तुम्ही तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. या स्पिकरची सध्याची किंमत २ हजार ८०० डॉलर्स म्हणजेच सुमारे १ लाख ९२ हजार इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -