घरटेक-वेकPUBG App Ban: पब्जीला आहेत हे लोकप्रिय गेम्सचे पर्याय

PUBG App Ban: पब्जीला आहेत हे लोकप्रिय गेम्सचे पर्याय

Subscribe

सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल गेम्संपैकी एक असलेला PUBG सह ११८ Apps वर भारतात बंदी घातली आहे. या ११८ चिनी Apps आणि गेम्सला देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी धोकादायक असल्याचे म्हणत सरकारने बुधवारी या आदेशाची घोषणा केली. या निर्णयाने अनेकांना धक्का बसला असेल. मात्र, चिंता करायची गरज नाही. PUBG ला बरेच लोकप्रिय पर्याय आहेत.

कॉल ऑफ ड्यूटी : मोबाईल (Call of Duty: Mobile)

कॉल ऑफ ड्यूटीः मोबाइल हा गेम मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या गेमची लोकप्रियता वाढली आहे. या गेममध्ये झोम्बींना मारायचा असतं. या गेममध्ये PUBG सारखे वेगवेगळे नकाशे नाही आहेत. परंतु आपण स्वतःसाठी एक मोड निवडू शकता. प्रत्येक महिन्याला गेम अपडेट होत असतो आणि नवीन गेम मोड आणि शस्त्रे सतत जोडली जातात. हा गेम Android आणि iOS वर विनामूल्य उपलब्ध आहे.

- Advertisement -

फॉर्टनाइट (Fortnite)

PUBG नंतर लिस्ट तयार करायला गेलो तर बॅटल रॉयल्स पाठोपाठ फॉरनाइट गेमचा नंबर लागतो. हा गेम PUBG पेक्षा वेगळा आहे. फोर्टनाइट गेम पीसीवर देखील खेळता येतो. त्यामुळे मोबाईल प्लेअर्स आणि पीसी प्लेअर्स एकत्र खेळू शकतात. खेळाचे सौंदर्यशास्त्र (aesthetics) त्याला PUBG पेक्षा वेगळे करते. हा गेम Android आणि iOS वर उपलब्ध आहे.

गॅरेना फ्री फायर : रँपेज (Garena Free Fire: Rampage)

गॅरेना फ्री फायर : रँपेज हा गेम बॅटल रॉयल्सचाचा एक भाग आहे. हा गेम तब्बल १० कोटीवेळा डाउनलोड करण्यात आला असूनही, हा गेम पाहिजे तेवढा घराघरात पोहोचलेला नाही. या गेममध्ये १० मिनिटांची लढाई असेल आणि ५० लोक यात सहभागी होऊ शकतात. आपण हा गेम iOS आणि Android वर विनामूल्य डाऊनलोड करू शकता.

- Advertisement -

बॅटललँड्स रॉयल (Battlelands Royale)

हा गेम खेळताना तुम्हाला नक्कीच आनंद होईल. एका सामन्यात ३२ खेळाडू खेळू शकतात. या गेमध्ये टीम तयार करता येते. आपण हा गेम iOS आणि Android वर विनामूल्य डाऊनलोड करू शकता.

बटर रॉयल (Butter Royale)

हा खेळ मुलांसाठी आणि प्रौढांसाठीही उत्कृष्ट आहे. या गेममध्ये रक्तपात होत नाही, कारण या गेममध्ये बंदुकीच्या गोळ्यांऐवजी लोणीचा वापर केला जातो. मात्र, हा गेम खेळण्यासाठी Apple आर्केड सदस्यता आवश्यक आहे. हा गेम फक्त iOS साठी उपलब्ध आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -