Pubg Mobile भारतात पुन्हा सुरु होणार? या दिवशी घोषणा होण्याची शक्यता

pubg

तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या Pubg Mobile गेमवर साबर सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने भारतात बंदी घातली. मात्र, पुन्हा एकदा भारतात Pubg Mobile गेम सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PUBG मोबाइलची मूळ दक्षिण कोरियाची कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी चर्चा करत आहे.

या गेमद्वारे भारतीय लोकांचा डेटा देशाबाहेर स्टोअर होत असल्याचा दावा आहे. त्यामुळे भारतीय यूझर्सचा डेटा भारतातच स्टोअर व्हावा यासाठी भागिदारांशी कंपनी चर्चा करत आहे, असे म्हटले जात आहे. येणाऱ्या आठवड्यात कंपनी भारतातील योजनांबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दरम्यान गेम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, PUBG ने सॉफ्टबँक समर्थित पेटीएम आणि टेलिकॉम कंनी एअरटेलसह अनेक स्थानिक कंपन्यांशी चर्चा केली आहे. जेणेकरून त्यांना देशात लोकप्रिय मोबाइल गेम पब्लिश करण्यात रस आहे की नाही याचा अंदाज घेता येईल. मात्र, पेटीएमने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Pubg Mobile चे मूळ मालक कोरियन ब्ल्यूहोल आता क्राफ्टन म्हणून ओळखले जाते. कंपनीने टेंन्सेंट सोबत Pubg Mobile लाँच केला होता, आता ही भागीदारी कंपनी संपवत आहे. टेंन्सेन्ट सोबतची भारतात भागीदारी संपवण्याचे कारण स्पष्ट आहे. भारतात चीनविरोधी भावना असल्याने, अशा परिस्थितीत जनतेचा डेटा चीनकडे जाऊ नये, तो भारतात रहावा, अशी सरकारची इच्छा आहे.