आता फेसबुकवर दिसणार व्हाट्सएपचे स्टेटस

या फिचरच्या मदतीने व्हाट्सएपचे स्टेटस फेसबुकवर देखील पाहता येणार

Whatsapp

नुकताच व्हाट्सएपने एक नवं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे आता व्हाट्सएपवर क्यूआर कोड हे फिचर वापरता येणार असून या फिचरच्या मदतीने व्हाट्सएपचे स्टेटस फेसबुकवर देखील पाहता येणार आहे. व्हाट्सएप नेहमीच नवीन फिचर आपल्या युजर्ससाठी आणत असतं.

व्हाट्सएप बिटा मॉडेलमध्ये या फिचरच्या वापर करता येणार असून WA BetaInfo ने या क्यूआर कोडचा एक फोटो देखील शेअर केला आहे. आपले कॉन्टॅक्ट शेअर करण्यासाठी या फिचरचा वापर करता येणार आहे. क्यूआर कोडच्या साहाय्याने येणाऱ्या काळात व्हाट्सएप खरेदी विक्री देखील करता येणार आहे. हा कोड युजर्सना स्कॅन आणि शेअर देखील करता येणार आहे.

या क्यूआर कोडसाठी एक स्क्रीनबटन व्हाट्सएप देणार असून हे बटण प्रेस करून व्हाट्सएपवर क्यूआर कोड स्कॅन करता येणार आहे. हे फिचर व्हाट्सएपच्या 2.19.151 बिटा व्हर्जनमध्ये पाहता येणार आहे.