घरटेक-वेकTikTok च्या खरेदीसाठी आता ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये शर्यत

TikTok च्या खरेदीसाठी आता ओरॅकल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये शर्यत

Subscribe

मायक्रोसॉफ्टनंतर आता अमेरिकन कंपनी ओरॅकलने टिक टॉक TikTok खरेदी करण्यात रस दाखविला आहे. एफटीच्या अहवालानुसार ओरॅकलही या चिनी अॅपचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करु शकते. अहवालानुसार, सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल टिक टॉकची मूळ कंपनी बाईटडान्सशी चर्चा करत आहे. हे प्रारंभिक चर्चा आहे. यामुळे आता मायक्रोसॉफ्टला टिक टॉक खरेदी करण्यात थोडी अडचण येऊ शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश पारित केला आहे. यामध्ये बाईटडान्सला अमेरिकेत आपला व्यवसाय ९० दिवसांच्या आत विकण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वी, ट्रम्प यांच्या विधानानंतर, टिक टॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्याची तयारी सुरू आहे, असे मायक्रोसॉफ्टने निवेदनात म्हटले होते. एफटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की ओरॅकलचे अब्जाधीश सहकारी संस्थापक अ‍ॅलिसन डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने भारतात टिक टॉकवर बंदी आहे. मात्र, मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड टिक टॉकच्या भारतीय व्यवसायात गुंतवणूक करू शकते, अशा चर्चा सुरु आहेत. रिलायन्सच्या कथित कराराबाबत सध्या रिलायन्सकडून कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – ‘रिव्हर्स गिअर’सहीत जबरदस्त इंजिनवाली BMW R18 Cruiser बाईक सप्टेंबरमध्ये होणार लाँच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -