घरटेक-वेक'रश्मी' रोबोट साधणार तुमच्याशी संवाद

‘रश्मी’ रोबोट साधणार तुमच्याशी संवाद

Subscribe

रश्मी रोबोट आपल्याशी हिंदी, इंग्रजी, भोजपुरी आणि मराठी या चार भाषांमध्ये थेट संवाद साधू शकते.

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. तर दुसरीकडे अनेक कंपन्या भविष्यात माणसांचीही जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती करत आहेत. मध्यंतरी ‘सोफिया’ नावाचा एक स्त्री रुपातील एक रोबोट असाच गाजला होता. ‘सोफिया’ला तिच्यातील उत्कृष्ट तंत्रज्ञानामुळे आणि चांगल्या मानवी वागणुकीमुळे थेट सौदी अरेबियाचे नागरिकत्वही मिळाले होते. त्यापाठोपाठ आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ती ‘रश्मी’ रोबो. रश्मी रोबो ही सुद्धा स्त्री रुपातील एक रोबोट असून तिची निर्मीती भारतात करण्यात आली आहे. रांचीच्या रंजीत श्रीवास्तव यांनी या वैशिष्ट्यपूर्ण ‘रश्मी’ रोबोटची निर्मिती केली आहे. सौदी अरेबियाच्या सोफिया रोबोटपासून प्रेरणा घेऊन ‘रश्मी’ची निर्मिती केल्याचं रंजीत यांचं म्हणणं आहे. दोन वर्षांचे अथक परिश्रम आणि केवळ ५० हजार रुपये खर्च करुन रश्मीची निर्मिती करण्यात आली आहे. रोबोट असलेली ही रश्मी सध्या जगभरातील लोकांचं आणि शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावरही रश्मी रोबोटचे फोटो व्हायरल होत असून, नेटिझन्स आणि गॅजेट प्रेमींमध्ये तिचाच बोलबाला आहे. जाणून घेऊया, काय आहेत रश्मी रोबोटची ठळक वैशिष्ट्यं…

rashmi robot
रश्मी रोबोट (सौजन्य-inventiva.co.in)

रश्मी ४ भाषांमध्ये पारंगत

ज्याप्रमाणे प्रत्येक रोबोटचं एक खास वैशिष्ट्यं असतं त्याचप्रमाणे रश्मी रोबोटचंही एक मुख्य वैशिष्ट्यं आहे. रश्मी ही एक multilingual अर्थात एकापेक्षा जास्त भाषा बोलणारी रोबोट आहे. रश्मी आपल्याशी हिंदी, इंग्रजी, भोजपुरी आणि मराठी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकते. या चारही भाषांची सॉफ्टवेअर तिच्यामध्ये इनबिल्ट फिट करण्यात आली आहेत. दरम्यान ‘रश्मी’ रोबोटचे जनक रंजीत श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या शरीराचा ८० टक्के भाग पूर्ण करण्यात आला असून आता केवळ दोन्ही हात आणि पाय जोडण्याचं काम बाकी आहे. रश्मी लोकांच्या चेहऱ्यावरील भाव सहज ओळखू शकणार असल्याचं रंजीत यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार रश्मी स्वत:च्या भावनाही शब्दातून व्यक्त करु शकणार आहे. रश्मीच्या डोळ्यात कॅमेरे फिट करण्यात आले असून त्या कॅमेरांमध्ये तिच्यासमोर येणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा ती कैद करेल आणि २-३ वेळा तीच व्यक्ती पुन्हा समोर आल्यास रश्मी त्याला ओळखूही शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -