RBIची खास सुविधा; आता इंटरनेट आणि स्मार्टफोनशिवाय करता येणार ऑनलाईन पेमेंट

google pay phonepe other upi payment apps may impose transaction limit

आजकालच्या डिजिटल युगात प्रत्येकाला ऑनलाईन पेमेंट करायला आवडते. त्यामुळे स्वतःकडे कॅश ठेवण्याची झंझट संपली आहे. यासाठी जास्त करून गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe), पेटीएमचा (Paytm) जास्त वापर केला जातो. अशातच आता आरबीआयकडून एक नवी सुविधा मिळणार असल्याचे समोर आले आहे. या सुविधेच्या माध्यमातून आता तुम्ही इंटरनेट आणि स्मार्टफोनशिवाय ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. भारतीय रिझर्व्ह बँकचे गर्व्हनर यांनी घोषणा करत सांगितले की, ‘फीचर फोन असलेले लोकं लवकरच UPI वापरून पेमेंट करू शकतील.’

भारतीय रिझर्व्ह बँक आता यूपीआय आधारित पेमेंट्स प्रोडक्ट घेऊन येत आहे. त्यामुळे किपॅड फोनचा वापर करणाऱ्या लोकं आता यूपीआयचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. या सुविधेच्या माध्यमातून यूजर्स कमी पेमेंटदेखील सहज करू शकतात. आरबीआयकडून ऑनलाईन पेमेंटसाठी 24/7 हेल्पालाईन डिजिसोबत लाँच केले जाईल. ही एक प्रकारची हेल्पलाईन असून त्या अंतर्गत युजर्सना जागरुक केले जाईल.

दरम्यान फिचर फोन स्मार्टफोनपेक्षा जास्त वेगळे नसतात. यामध्ये टेक्स्ट मेसेज आणि कॉल करण्याव्यतिरिक्त आता ऑनलाईन पेमेंट देखील केले जाऊ शकते. आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, ‘किपॅड फोन वापरणाऱ्या लोकांना ऑनलाईन पेमेंट सुविधा देणे गरजेचे आहे.’


हेही वाचा – इंटरनेटशिवाय Googleचे हे फिचर करते काम; जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत