घरटेक-वेक‘RC 125 ABS’ बाईक भारतात लाँच

‘RC 125 ABS’ बाईक भारतात लाँच

Subscribe

केटीएम या युरोपातील बाईक कंपनीने नव्याकोर्‍या ‘RC 125 ABS’चे दणक्यात लॉचिंग केले आहे. गेल्या 65 वर्षांत 300 जागतिक चॅम्पियनशिप्ससह केटीएमची मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात उत्कृष्ट परंपरा आहे. 2012 साली भारतात प्रवेश केल्यानंतर, येथेही केटीएम हा देशातील जलद गतीने वाढणारा मोटरसायकल ब्रॅण्ड आहे.

नव्याकोर्‍या RC 125 मुळे बाईकप्रेमींना केटीएमच्या सूपरस्पोर्ट्स मोटरसायकलिंग विश्वात प्रवेश करता येणार आहे. RC 16 या केटीएमच्या मोटी जीपी मशीनद्वारे प्रेरित ही बाईक साध्या रस्त्यावर व रेसिंग ट्रॅकवर चांगली पकड घेण्यासाठी fully faired बाईक आहे. प्रत्येक केटीएम मोटरसायकलप्रमाणे, RC 125 सुद्धा रेडी टू रेस बाईक आहे. अनेक प्रिमियम कम्पोनण्ट्स असलेली ही बाईक खर्‍या अर्थाने मोटरसायकलिंग तंत्रज्ञान आणि अभिययांत्रिकीसह केटीएमने तयार केली आहे. केटीएमची नेत्रदीपक स्टील ट्रेलिस फ्रेम, डब्लूपीचे upside down आणि पुढे असलेले सस्पेन्शन आणि उत्कृष्ट हॅण्डलिंगसाठी ट्रिपल क्लॅम्प हॅण्डलबार ही वैशिष्ट्ये या गाडीत आहेत.

- Advertisement -

या दुचाकीचे सूपरस्पोर्ट मूळ अधोरेखित करण्यासाठी ही बाईक 2 आकर्षक रंगांत सादर करण्यात आली आहे. RC 125 च्या अत्याधुनिक डीओएचसी इंजिनामुळे 14.5 PS ऊर्जा निर्माण केली जात असून 12 NM् टॉर्क तयार होतो. याचे प्रोजेक्टर हेडलाईट्स डीआरएलचे असून बॉशचे ABS यात देण्यात आले आहेत. यामुळे मोटरसायकलिंग प्रेमींसाठी हे उत्कृष्ट पॅकेज आहे.

बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रोबायकिंग विभागाचे उपाध्यक्ष सुमीत नारंग म्हणाले, जेत्या परफॉर्मन्ससाठी आणि सोप्या handling साठीच केटीएमच्या मोटरसायकल्स वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बनवण्यात आल्या आहेत. RC 125 बाबतही हेच तत्व आहे. सूपरस्पोर्ट्स विश्वात प्रवेश करू इच्छिणार्‍या मोटरसायकलप्रेमींसाठी केटीएमचा अद्वितीय अनुभव देणारी RC 125 ही बाईक आम्ही सादर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -