घरटेक-वेकरिअलमी X आणि रिअलमी 3i भारतात लाँच

रिअलमी X आणि रिअलमी 3i भारतात लाँच

Subscribe

रिअलमीने ‘रिअलमी X’ आणि ‘रिअलमी 3i’ही आपली दोन नवीन मॉडेल्स बाजारात दाखल केली. ही नवी मॉडेल्स डिझाईन, कामगिरी आणि दर्जा या तिन्ही बाबतीत ग्राहकांच्या अपेक्षांना पुरून उरणारी आहेत. रिअलमी Xची रचना अत्याधुनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ग्राहकांना अत्यंत वाजवी दरातील, खराखुरा फुल व्ह्यू अनुभव देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एफएचडी+नॉचलेस सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५चं सुरक्षाकवच असून पोलर व्हाइट आणि स्पेस ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील एक कॅमेरा ४८ मेगापिक्सल आणि दुसरा ५ मेगापिक्सलचा आहे. कॅमेर्‍यात सोनी आयएमएक्स ५८६ सेंसरचा वापर करण्यात आलाय. सेल्फीसाठी या फोनमध्ये सोनी आयएमएक्स ४७१ सेंसरसह १६ मेगापिक्सलचा एआय पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन ७१० एआयई प्रोसेसर आहे.

रिअलमी 3i या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ४,२३० एमएएच क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग ११ तास पबजी खेळता येणं शक्य आहे, याशिवाय २१ तास ब्राऊझरवर इंटरनेटचा वापर आणि १३ तास युट्युबचा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला एआय ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा १३ मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे.

- Advertisement -

३जीबी रॅम +३२ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे, तर ४जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. रिअलमी X ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये, तर ८जीबी रॅम+१२८जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -