घरटेक-वेक‘रीअलमी सी२’ स्मार्टफोनच्या ऑफलाइन विक्रीला सुरुवात

‘रीअलमी सी२’ स्मार्टफोनच्या ऑफलाइन विक्रीला सुरुवात

Subscribe

रीअलमी या कंपनीचे स्मार्टफोन देशभरातील ८००० स्टोअर्सच्या माध्यमातून ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध होत आहेत. २ जीबी रॅम व १६ जीबी रोम, २ जीबी रॅम व ३२ जीबी रोम आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी रोम या तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध या फोनची किंमत ५,९९९/- रूपयांपासून सुरु होते.

या फोनमध्ये पहिलीच ड्यूड्रॉप फुल स्क्रीन, ड्युअल कॅमेरा सेटअप, १२ एनएम ऑक्टाकोर प्रोसेसर, प्रीमिअम डागमुक्त डायमंड डिझाइन, ८० एफपीएस/४८० पी स्लो, मोशन व्हिडिओ यांसारखी सर्वोत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

- Advertisement -

भारतातील रीअलमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ म्हणाले, ’’रीअलमी सी२साठी ग्राहकांची झपाट्याने वाढत असलेली मागणी पाहता आम्ही आमच्या ऑफलाइन स्टोअर्समध्ये डिवाईस उपलब्ध करून देत आहोत. सुरूवातीला डिवाईस विक्रीसाठी फ्लिपकार्ट आणि आमच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होता आणि त्याला भरघोस प्रतिसाद देखील मिळाला. हा उपक्रम आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहक अनुभव देण्यासाठी आमच्या कटिबद्धतेला पूर्ण करतो.’’

फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, ज्यामुळे एका चार्जिंगमध्ये दिवसभर फोन वापरण्याची खात्री मिळते. रीअलमी सी२ मधील २.० गिगाहर्टझ व १२ एनएम ऑक्टाकोअर हेलिओ पी२२ प्रोसेसर बॅटरी दीर्घकाळ टिकण्याची व शक्तिशाली कामगिरीची खात्री देते. रीअलमी सी२मध्ये विस्तारित होईल असा २५६ जीबी स्टोरेज क्षमतेसह स्वलतत्र कार्ड स्लॉट आहे, जे ड्युअल सिम ४जीला सपोर्ट करते.

- Advertisement -

उत्तमरित्या सानुकूल एआय ड्युअल रिअर कॅमेरा (१३ मेगापिक्सल व २ मेगापिक्सल) अधिक सुस्पष्ट व वास्तविक फोटोंसाठी योग्य आहे. यामधील क्रोमा बूस्ट३ एचडीआर रेंज व रंग सुधारू शकते. रीअलमी सी२ हा या किंमतीमधील ८० एफपीएस/४८०पी स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पहिला स्मार्टफोन असेल. रीअलमी सी२मध्ये अँड्रॉईड पाय ९.० वर आधारित कलर ओएस ६ सिस्टिम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -