घरटेक-वेक'Realme Buds Air Neo' भारतात झाले लाँच, जाणून घ्या फिचर्स

‘Realme Buds Air Neo’ भारतात झाले लाँच, जाणून घ्या फिचर्स

Subscribe

रियलमीने भारतात आणखी एक ट्रू वायरलेस डिव्हाइस Buds Air Neo लाँच केला आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या कंपनीच्या पहिल्या ट्रू वायरलेस इअरबड्स सारखेच आहे. रियलमीने आज अनेक उत्पादने भारतात लाँच केली आहे. Realme TV, Realme Watch, Realme BudsAir Neo सह Realme PowerBank देखील लाँच होत आहे. भारतात Realme Buds Air २ हजार ९९९ रुपये किंमतीने लाँच केले आहे. याची किंमत पहिल्या ट्रू वायरलेस इअरबड्सपेक्षा १००० रुपयांनी कमी आहे.

आज दुपारी तीन वाजता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फक्त पांढऱ्या रंगाच्या इअरबड्सची आज विक्री होणार आहे. लाल आणि हिरवा इअरबड्स येणार दिवसांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.

- Advertisement -

या डिव्हाइसच्या लाँचिंग दरम्यान कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, Realme Buds Air भारतात Apple AirPods च्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रू वायरलेस इअरबड्सची विक्री आहे. तसेच रियमलीने भारतात १ मिलियन म्हणजेच १० लाख वायरलेस इअरफोन्सची विक्री केली आहे. Realme BudsAir Neo मध्ये ऑडियो बूस्टसाठी 13mm डायनॅमिक बास बूस्ट ड्राइव्हर दिले आहेत. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ऑटो कनेक्शन मोड दिला आहे.

- Advertisement -

हे ट्रू वायरलेस इअरबड्स 119.2ms सुपर लो लेटेन्सीवर काम करते. यामध्ये Realme Buds Air सारखे इंटेलिजेंट टच कंट्रोल फीचर दिले आहे. त्याला डबल टॅप करून आपण कोणाताही कॉल रिसीव्ह करू शकतो. तसेच गाणी बंद आणि सुरू करू शकता. एका बाजूला प्रेस करून तुम्ही कॉल कट करू शकता. तीन वेळा टॅब केल्यावर पुढील गाणे सुरू करू शकता. दोन्ही बड्सला एकत्र प्रेस करून मेनूमधून बाहेर पडू शकता. अशाप्रकारे अनेक फिचर तुम्हाला या इअरबड्समध्ये मिळतील.


हेही वाचा – केवळ ५ हजारांच्या EMI वर खरेदी करता येणार टाटा कंपनीची ‘ही’ कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -