घरटेक-वेकRealme C21Y ने ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच; जाणून घ्या, किंमतीसह फीचर्स

Realme C21Y ने ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच; जाणून घ्या, किंमतीसह फीचर्स

Subscribe

Realme कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना युनिक फीचर्स देत असते. कंपनीने नुकताच व्हिएतनाममध्ये Realme C21Y लाँच केला आहे. हा कंपनीच्या सी सीरीजचा फोन असून या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि रीअर माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला आहे. हे दोन रॅम आणि स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. Realme C21Y ची किंमत 3 GB + 32 GB व्हेरिएंटसाठी व्हीडीएन 3,240,000 आणि 4 GB+ 64 GB व्हेरिएंटसाठी व्हीडीएन 3,710,000 ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक कॅरो आणि कार्मल ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतात Realme C21Y लाँच करण्याबाबत सध्या कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

असे आहेत फीचर्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड Realme UI वर आधारित असून ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्ट करतो. या फोनला 6.5 इंचाचा HD+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि Mali-G52 GPU सह ऑक्टा-कोर Unisoc T610 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

Realme C21Y ची इंटरनल मेमरी 64 GB असून कार्डच्या मदतीने ती वाढविली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13 MP चा आहे. याव्यतिरिक्त, यात 2 MP ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट सेन्सर आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी संदर्भात सांगायचे झाले तर Realme C21Y LTE, Wi-Fi, ब्लूटूथ V 5, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्टला सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh असून रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -