Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक भारतात Realme चा पहिला टॅबलेट झाला लाँच; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

भारतात Realme चा पहिला टॅबलेट झाला लाँच; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Related Story

- Advertisement -

भारतात Realme कंपनीच्या स्मार्टफोनचे युजर्स सर्वाधिक आहेत. मात्र कंपनीने नुकताच आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी Realme 8i, Realme 8s आणि Realme Pad लाँच केला आहे. Realme चे नवीन फोन Realme 8 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. तसेच Realme Pad हा कंपनीचा पहिला टॅबलेट असून कंपनीने तो आज लाँच केला आहे. Realme Pad मध्ये 10.4-इंच WUXGA + इमर्सिव्ह डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्यूशन 2000 x 1200 पिक्सेल असे आहे. त्याची स्क्रीन टू बॉडी रेशो 82.5 टक्के अशी देण्यात आली आहे. यामध्ये Helio G80 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे.

जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

- Advertisement -

या Realme Pad मध्ये 7000mAh ची बॅटरी देण्यात आली असून कंपनीचा असा दावा आहे की, यावर 12 तास सतत व्हिडिओ पाहता येऊ शकतात. यासह या फोनमध्ये स्टँडबाय टाइम 65 तास असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. Realme Pad ची सुरुवातीची किंमत 13 हजार 999 रुपये अशी आहे. ही किंमत त्याच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज WIFI मॉडेलसाठी आहे. याशिवाय 3 GB रॅम आणि 32 GBस्टोरेज 4G LTE आणि WIFI मॉडेल 15 हजार 999 रुपये अशी त्याची किंमत असणार आहे.

Realme Pad च्या 4 GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या4G LTE आणि WIFI मॉडेलची किंमत 17 हजार 999 रुपये असल्याचे कंपनीने म्हटले आहे. युजर्सना Realme Pad ची खरेदी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून करता येणार आहे. Realme Pad हा Android 11 वर आधारित असून तो Realme UI वर चालतो. या फोनचे वजन केवळ 440 ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. त्याची जाडी 6.9 mm इतकी असून यामध्ये Dolby Atmos Quad स्पीकर्स देण्यात आले आहेत.


केरळमध्ये कोरोनाचं थैमान! दिवसभरात ३० हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद १८१ रुग्णांचा मृत्यू
- Advertisement -