Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Realmeचा नवीन बजेट स्मॉर्ट फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर फिचर्स

Realmeचा नवीन बजेट स्मॉर्ट फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर फिचर्स

बुधवारपासून हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि इतर साइट्सवर उपलब्ध होणार

Related Story

- Advertisement -

Realmeने नवीन एंट्री लेव्हल बजेट स्मॉर्टफोन C25s लाँच केला आहे. Realmeच्या C सीरिजमधील हे नवीन मॉडेल आहे. फोनमध्ये मोठी स्क्रिन आणि हाय कपॅसिटी बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेमिंगसाठी हा फोन उत्तम असणार आहे. Realme C25s मध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट 4GB + 64GB आणि 4GB + 128GBमध्ये उपलब्ध आहे. 4GB + 64GB ची किंमत ९,९९९ इतकी आहे. तर 4GB + 128GBची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे. वॉटरी ग्रे आणि वॉटरी ब्लू कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. येत्या बुधवारपासून हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि इतर साइट्सवर उपलब्ध होणार आहे. (Realme launches C25s new budget smartphone,price and other features)

काय आहेत  C25s फोनचे फिचर्स?

फिंगर प्रिंट सेंसर आणि सुपर पावर सेव्हिंग मोड

Realme C25s फोनला फिंगर प्रिंट सेंसर आणि सुपर पावर सेव्हिंग मोड देण्यात आला आले आहे. आमच्या एट्री-लेव्हल C सीरिजला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सीरिज आमच्या ब्रँडची प्रमुख ओळख असल्याचे रिअल मीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मीडिटेक हेलियो G85गेमिंग प्रोसेसर

- Advertisement -

Realme C25s फोनमध्ये मीडिटेक हेलियो G85गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. ६.५ इंचाची स्क्रिन आणि ६०००mAhची बॅटरी देण्यात आली आहे. १८Wचा टाइप C चार्जर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १३MP Triple AI कॅमेरा आणि ८ MPसेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realmeचा सिल्व्हर कलर वॉचची ७ जूनपासून फ्लिपकार्ट आणि रिअल मीच्या स्टोअर्समध्ये विक्री सुरु होणार आहे. डिसेंबर 202मध्ये कंपनीने पहिल्यांदा स्मार्टवॉच लॉन्च केले. त्यानंतर कंपनीने केवळ ब्लॅक बॉडी ऑप्शनसह हे लाँच केले होते. आता कंपनीने ग्राहकांना निळ्या, हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या पट्ट्यांचा पर्याय दिला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Income Taxची नवीन वेबसाइट क्रॅश, Infosys वर भडकल्या अर्थमंत्री निर्मला सितारमण

- Advertisement -