भारतात Realme Narzo 30 चा पहिला सेल! जाणून घ्या किंमतीसह फीचर्स आणि ऑफर

भारतात Realme Narzo 30 चा पहिला सेल! जाणून घ्या किंमतीसह भन्नाट फीचर्स

Realme कंपनीने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Realme Narzo 30 भारतीय बाजारात लाँच केला आहे. Realme Narzo 30 सोबतच कंपनीने Realme Narzo 30 5G देखील लाँच केले.Realme Narzo 30 मध्ये मीडियाटेक हेलिओ G 95 प्रोसेसर आहे. या व्यतिरिक्त या फोनमध्ये 90 हर्ट्झचा रीफ्रेश रेट असणारा 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून जी 30W डर्ट चार्जला सपोर्ट करते. Realme Narzo 30 या स्मार्टफोनचा पहिला सेल भारतात आज म्हणजेच 29 जून रोजी आहे. आज दुपारी 12 वाजता Realme Narzo 30 फ्लिपकार्ट व कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार आहे.

अशी आहे किंमत

Realme Narzo 30 च्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आहे आणि 128 जीबी स्टोरेजसह 6 जीबी रॅमची किंमत 14,499 रुपये आहे. Realme Narzo 30 रेसिंग ब्लू आणि रेसिंग सिल्व्हर कलर्समध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आज हा फोन 500 रुपयांच्या सूटसह ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

असे आहेत फीचर्स

Realme Narzo 30 मध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड Realme UI 2.0 आहे. या व्यतिरिक्त, यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे आणि ब्राईटनेस 580 निट्स आहे. डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G 95 प्रोसेसर आहे, 6 जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे, ही स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने वाढविली जाऊ शकते.

Realme Narzo 30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 48 मेगापिक्सल आहे, ज्याचा अपर्चर एफ / 1.8 आहे. दुसरे लेन्स एफ / 2.4 च्या अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16-मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहेत. कॅमेर्‍यासह सुपर नाईटस्केप, अल्ट्रा 48 मेगापिक्सल मोड, पॅनोरामा, पोर्ट्रेट आणि एचडीआर सारख्या मोड्स देण्यात आले आहेत.