घरटेक-वेकRealme कंपनी लवकरच Narzo सीरिजचे दोन बजेट फोन लाँच करणार

Realme कंपनी लवकरच Narzo सीरिजचे दोन बजेट फोन लाँच करणार

Subscribe

काही महिन्यांपूर्वीच रिअलमी (Realme)ने भारतात नार्झो (Narzo) सीरिज लाँच केली होती. या सीरिज अंतर्गत कंपनीने भारतामध्ये दोन फोन नार्झो १० (Narzo 10) आणि नार्झो १०ए (Narzo 10A) लाँच केला आहे. माहितीनुसार आता कंपनी या सीरिज अंतर्गत नवीन मॉडल्स लाँच करण्याची तयारी करत आहे. रिअलमी नार्झो सीरिजला भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय ग्राहकांनी फ्लॅश सेलमध्ये हे दोन फोन जास्तीत जास्त घेतले आहेत.

नार्झो २० आणि नार्झो २०प्रो लाँच करण्याच्या तयारीत

टिप्सटर मुकुल शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये असा दावा केला आहे की, कंपनी आता रियलमी नार्झो २० (Realme Narzo 20) आणि रियलमी नार्झो २० प्रो (Realme Narzo 20 Pro) लाँच करण्याची तयारी करत आहे. या दोन्ही फोनच्या किंमत आणि फिचर्सबद्दल काही माहिती दिली नाही आहे. कंपनी आता लवकरच या दोन्ही फोनशी संबंधित घोषणा करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

हे दोन्ही फोन इंडोनेशिया मार्केटमध्ये उपलब्ध असलेले रियलमी सी३ (Realme C3) ट्रिपल रियर कॅमेरा व्हर्जन आहे. तर भारतात मिळत असलेला रिअलमी ६आय (Realme 6i) पण युरोपियन मार्केटमध्ये उपलब्ध असलेला रिअलमी ६एस (Realme 6S) रिबेस्ड व्हर्जन आहे.

- Advertisement -

रिअलमीच्या या डिव्हाईसचा 4 जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर रिअलमी १ए च्या ३ जीबी+ ३२ जीबी मॉडेलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तसेच फोनच्या ४ जीबी+६४ जीबी मॉडेलची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ब्लू आणि व्हाइट कलरमध्ये येतो. अँड्रॉइड १०वर काम करणाऱ्या रिअलमी नार्झो १०एमध्ये ६.५ इंच एचडी + डिस्प्ले मिळतो. ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१,६०० पिक्सल आहे. फोनमध्ये ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबीपर्यंत स्टोरेजसह ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो जी७० प्रोसेसर मिळतो. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.


हेही वाचा – Railyatri वेबसाईटवरील ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -