घरटेक-वेकशाओमी, रिअलमी, सॅमसंग, विवो या स्मार्टफोन फोन कंपनीने घरपोच डिलिव्हरी केली सुरू

शाओमी, रिअलमी, सॅमसंग, विवो या स्मार्टफोन फोन कंपनीने घरपोच डिलिव्हरी केली सुरू

Subscribe

देशात लॉकडाऊन दरम्यान शाओमी, रिअलमी, विवो आणि सॅमसंग यासारख्या मोठ्या स्मार्टफोन कंपनीने आपली ई-स्टोअर सर्विस सुरू केली आहे. देशात चार मेपासून लॉकडाऊन ३.० दरम्यान सरकारने काही सवलती दिल्या आहेत. यामध्ये ई-स्टोअरद्वारे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये वस्तू विक्री करण्यास परवानगी दिली आहे. १७ मेपर्यंत लॉकडाऊन ३.० देशात जाहीर करण्यात आला आहे.

आता ४० दिवसांच्या लॉकडाऊननंतर OEMs स्मार्टफोन, टीव्ही मॉडेल्स आणि लॅपटॉपसाठी ऑर्डर घेणे सुरू केले आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. अॅमेझोन आणि फ्लिपकार्टने स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय काही शहरात स्टँडअलोन रिटेल स्टोअर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनच्या दुकानांचा देखील समावेश आहे. दरम्यान विवोने जाहीर केलं आहे की, २० हजार ऑफलाईन रिटेल पार्टनर घरपोच स्मार्टफोनची डिलिव्हरी करतील.

- Advertisement -

शाओमी, रिअलमी, विवो किंवा सॅमसंगकडून स्मार्टफोन ऑर्डर करण्यापूर्वी आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाइवर जावे लागेल. सध्या डिलिव्हरी काही पिन कोड पुरती मर्यादित आहेत. वेबसाईट जाऊन ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये राहणारे ग्राहक पिन कोड टाकून त्यांच्या क्षेत्रात डिलिव्हरी होत आहे की नाही हे पाहू शकते. यादरम्यान अनेक कारणास्तव डिलिव्हरी करण्यास उशीर होऊ शकतो.


हेही वाचा  – लवकरच Mi 10 5G भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -