घरटेक-वेकथ्रीडी डिस्प्लेचा स्मार्टफोन लवकरच तुमच्या खिशात

थ्रीडी डिस्प्लेचा स्मार्टफोन लवकरच तुमच्या खिशात

Subscribe

मुव्ही शुटींगसाठी आणि फोर के व्हिडीओसाठी उत्तम प्रतीचे कॅमेरे बनविणाऱ्या रेड कंपनीने आता एक अनोखा स्मार्टफोन हायड्रोजन वन नावाने आणला आहे. हा फोन कोणत्याही व्हिडीओ अथवा दृश्याचे थ्रीडी होलोग्राफिक मोडमध्ये डिस्प्ले रेकॉर्ड करू शकतो. युएसए टुडे डॉट कॉमवर या स्मार्टफोनची माहिती दिली गेली आहे.

असा असेल हा स्मार्टफोन –

- Advertisement -

त्यानुसार १ ऑगस्ट २०१८ ला हा फोन लाँच होणार असून, त्याचे प्रीबुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर सुरू झाले आहे. या प्रकारचा हा जगातला पहिलाच थ्री डी डिस्प्लेचा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ युजरला शानदार थ्रीडी मुव्ही पाहिल्याची मजा देऊ शकतील, असा दावा केला जात आहे. हा फोन अँड्रॉईड ओएसला सपोर्ट करतो आणि त्याला ५.७ इंची स्क्रीन दिला गेला आहे. हा फोन कोणत्याही डीएसएलआर किंवा एचडी व्हिडीओ कॅमेऱ्याच्या पुढचा फ्युचर फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

स्मार्टफोनची किंमत ८४ हजार –

- Advertisement -

या फोनला दोन फ्रंट कॅमेरे आहेत. त्यामुळे सेल्फी आणि व्हिडीओ अधिक देखणे येतात. त्याचबरोबर पॉवरफुल स्टिरीओ स्पिकरमुळे गाणी ऐकणे आणि व्हिडीओ पाहण्याची मजा अनेक पटीने वाढते. हा फोन खास मुव्ही मेकर्स आणि क्रिएटीव्ह युजरसाठी असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. या फोनच्या किंमती १२०० डॉलर म्हणजे ८४००० रुपयांपासून सुरू होत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -