घरटेक-वेकरेडमी ५ ए बाजारात दाखल

रेडमी ५ ए बाजारात दाखल

Subscribe

बाजारामध्ये शाओमी रेडमी ५ ए पुन्हा दाखल झाला आहे. किंमत कमी असल्यामुळं या फोनचा खप जास्त आहे. ग्राहकांकडून मागणी जास्त असल्यामुळं पुन्हा एकदा हा फोन दाखल झाला आहे.

शाओमीच्या रेडमी ५ ए फोनची सुरुवातीपासून बाजारामध्ये हवा आहे. कमी किमतीमध्ये चांगला पर्याय म्हणून हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. कमी किमतीत मिळत असल्यामुळं ग्राहकांना हा फोन विकत घेणं सध्या कठीण झालं होतं. मात्र आता १३ ऑगस्टला ५ ए आणि ५ ए प्रो ची विक्री फ्लिपकार्टवर करण्यात येणार आहे. त्यामुळं या फोनसाठी आता फ्लॅश सेलची वाट पाहावी लागणार नाही. या दिवशी लोकांना हे दोन्ही फोन उपलब्ध होतील.

काय आहे ५ ए आणि ५ प्रो ची किंमत?

रेडमी ५ ए आणि रेडमी ५ प्रो मध्ये दोन प्रकारचे स्टोरेज आहेत. २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज असणारा ५ ए मोबाईल हा ५,९९९ रुपयाला तर ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजवाला रेडमी ५ ए मोबाईल फोन ६,९९९ रुपयाला मिळणार आहे. याशिवाय ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजवाला रेडमी नोट ५ प्रो ची किंमत १४,९९९ इतकी असून ६ जीबी रॅम आणइ ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ही १६,९९९ इतकी असणार आहे. दोन्ही फोन www.mi.com अथवा www.flipkart.com या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. इतकंच नाही तर, रेडमी ५ ए या फोनसाठी तुम्हाला प्रतिमाह २०० रुपये भरूनदेखील फोनची खरेदी करता येऊ शकते.

- Advertisement -

फोनचं स्पेसिफिकेशन

रेडमी ५ ए हा फोन ५ इंच एचडी डिस्प्लेचा असून क्वाड-कोर क्वालकॅम स्पॅनड्रॅगन ४२५ प्रोसेसरचा आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल रिअर आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अँड्रॉईड ७.१.२ नोगटसह येणाऱ्या रेडमी ५ ए मध्ये ३००० एमएएच बॅटरी आहे. तर रेडमी नोट ५ प्रो मध्ये ५.९९ इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये क्वालकॅम स्पॅनड्रॅगन ६३६ एसओसी ऑक्टाकोअर प्रोसेसर आहे. यामध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा लावण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -