घरटेक-वेकउद्या Redmi 9 Prime चा पहिला फ्लॅश सेल, जाणून घ्या किंमत आणि...

उद्या Redmi 9 Prime चा पहिला फ्लॅश सेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

रेडमी ९ प्राइम (Redmi 9 Prime) स्मार्टफोनचा पहिला फ्लॅश सेल उद्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon आणि Mi.com वर खरेदी करू शकाल. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाईल डिस्प्लेसह पाच कॅमेरे मिळेल. MediaTek Helio G80 चिपसेटवर काम करेल. यावर्षी जूनमध्ये स्पेनमध्ये लाँच करण्यात आलेला रेडमी ९ आता रेडमी ९ प्राइम या नावाने भारतात लाँच केला गेला आहे.

किंमत आणि फिचर्स

- Advertisement -

भारतात रेडमी ९ प्राइम बजेट रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तसेच 6GB + 128GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. यापूर्वी रेडमी ९ प्राइम स्मार्टफोन Amazon Prime Day मध्ये ६ ऑगस्ट पासून ते १२ ऑगस्टपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध केला होता.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

- Advertisement -

अँड्रॉइड १० ओएससह MIUI 11लाँच केलेला रेडमी ९ प्राइममध्ये ६.५३ इंच फुल एचडी+आईपीएस डिस्प्ले दिला आहे. जो प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ कोटेडसह दिला आहे. या स्मार्टफोनला MediaTek Helio G80 प्रोसेसरसोबत लाँच केले आहे. यामध्ये दिलेला स्टोरेज युजर्स आपल्या वापरानुसार मायक्रोएसडी कार्ड वापरून ५१२ जीबी पर्यंत वाढवू शकतात.

कॅमेरा आणि बॅटरी

रेडमी 9 प्राइममध्ये फोटोग्राफीसाठी एकूण पाच कॅमेरे दिले आहेत. यात क्वाड रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 13MP प्राइमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5MP मॅक्रो शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. तर 8MP फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी वापरला जाऊ शकतो. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,020mAh बॅटरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -