Redmi Note 7 Pro स्मार्टफोन झाला स्वस्त; अशी आहे नवी किंमत

Redmi Note 7 Pro च्या ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजच्या दोन्ही स्मार्टफोन स्वस्त

शाओमी ४८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन रेडमी नोट ७ प्रो (Redmi Note 7 Pro) ची किंमत कंपनीने कमी केली आहे. Redmi Note 7 Pro च्या ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजच्या दोन्ही स्मार्ट फोन्सची किंमत पुर्वीपेक्षा कमी करण्यात आली आहे.

कंपनीने हा स्मार्टफोन २०१९ च्या सुरूवातीला लाँच केला होता. त्यावेळी या फोनची किंमत १३ हजार ९९९ इतकी होती. मात्र आता ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रूपये केली आहे. तर १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रूपयांऐवजी १४ हजार ९९९ रूपयांना खरेदी करता येणार आहे.

Redmi Note 7 Pro चे असे आहेत फिचर्स

  • २३४०x१०८० पिक्सेल रिझॉल्यूशन
  • ६.३ इंचाचा फूल HD डिस्प्ले
  • ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा
  • सेल्फीसाठी १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • ४०००mAhची बॅटरी

कंपनी रेडमी नोट ८ लाँच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्या नवीन मॉडेल लाँच करण्यापूर्वी जुन्या फोनच्या किंमती कमी करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.