घरटेक-वेकआजपासून 'रेडमी नोट ९ प्रो'च्या विक्रीला सुरुवात

आजपासून ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या विक्रीला सुरुवात

Subscribe

रेडमी नोट ९ प्रो स्मार्टफोनची आज दुपारी १२ वाजल्यापासून भारतात विक्रि सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. रेडमी नोट ९ प्रो शाओमी इंडिया वेबसाइट आणि अॅमेझॉनवरुन विकत घेता येणार आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील अनावश्यक वस्तूंना सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये या स्मार्टफोनची डिलीव्हरी करण्यात येणार आहे.

रेडमी नोट ९ प्रो भारतात दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 4GB + 64GB आणि 6GB + 128GB. त्यांची किंमत अनुक्रमे १३,९९९ आणि १६,९९९ रुपये आहे. अ‍ॅमेझॉन आणि शाओमीच्या दोन्ही वेबसाइटवर, आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर एक हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसंच, ही ऑफर आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर लागू असेल.

- Advertisement -

रेडमी नोट ९ प्रो स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 11 वर चालतो आणि ६.६७ इंचाचा फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सल) IPS डिस्प्ले आहे. हा 6GB LPDDR4X रॅम, Adreno 618 GPU आणि ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे.


हेही वाचा – शाओमीचा Mi Note 10 Lite लाँच; जाणून घ्या फिचर्स

- Advertisement -

फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे. याशिवाय 8MPचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची अंतर्गत मेमरी 128 जीबी आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5,020mAh बॅटरी आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -