जबरदस्त! चीनला टक्कर देण्यासाठी जिओचा स्वस्त स्मार्टफोन, ५ हजारांपेक्षाही कमी किंमतीत

jio smartphone
Jio नेटवर्क डाऊन; ट्विटरवर युजर्सकडून तक्रारींचा पूर

रिलायन्स जिओ लवकरच अँड्रॉयडवर काम करणारा स्वस्त स्मार्टफोन घेऊन येणार आहे. यासाठी कंपनीने स्थानिक कंपन्यासोबत पार्टनरशीप सुद्धा केली आहे. कंपनी लोकल सप्लायर्सला भारतात प्रोडक्शन कॅपिसिटी वाढवण्यासाठी सांगितले आहे. कंपनी पुढील वर्षी २० कोटी स्मार्टफोन युनिट्स तयार करू शकेल.

ही असू शकते किंमत

कंपनीचा हा नवीन फोन जिओ फोनचे एक व्हर्जन असू शकते. ताज्या रिपोर्टमध्ये फोनची किंमत सांगितली आहे. Bloomberg च्या रिपोर्टनुसार गुगलच्या अँड्रॉयड आधारित जिओचा हा फोन जवळपास ४ हजार रूपये असा असू शकतो. रिलायन्स जिओचे लक्ष्य पुढील दोन वर्षात १५ ते २० कोटी फोन विकण्याचे आहे. इंडिया सेलुलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतात १६.५ कोटी स्मार्टफोन आणि जवळपास इतकेच बेसिक फोन असेंबल झाले आहेत.

एअरटेलचे ४ जी डिव्हाइस

केवळ रिलायन्स नाही तर एअरटेलसुद्धा ४ जी स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. जिओच्या स्वस्त फोनने एअरटेल आणि वोडाफोनसाठी महागात पडणार आहे. २ जी ग्राहक जिओमध्ये येवू शकतात. जुलै मध्ये गुगलने जिओत ४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे गुगल आणि जिओ मिळून देशातील ५०० कोटी लोकांना लक्ष्य करणार आहेत.


हे ही वाचा – ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेबद्दल निर्माता सुबोध भावेने सांगितली खास गोष्ट!