जिओ चा दिवाळी धमाका प्लान

१००% कॅशबॅक आणि १ वर्ष सर्व काही फ्री

Reliance Jio announces new plan 1699 rupess 100% cashback offer 1 year free
जिओ

टेलिकॉम इंडस्ट्रीतलं युद्ध काही संपणयाचं नाव घेत नाहीये. दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओ च्या लॉन्चमुळे हे युध्द सुरू झाले. या युध्दामुळे ग्राहकांचा मात्र खूप फायदा होत आहे. ग्राहकाला खिशाला परवडणारा स्वस्त असा डेटा प्लॅन देत आहेत. अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला एक जीबी डेटा देत आहेत. या स्पर्धेत टेलिकॉम इंडस्ट्रीत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले, या स्पर्धेत टिकण्यासाठी दोन कंपन्या एकत्र येताना दिसल्या, तर काहींना कंपनीचं शटर बंद केलं.

दिवाळीच्या निमित्तावर रिलायन्सने एक धमाकेदार प्लान मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. हा प्लान जिओच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. रिलायन्सने या प्लानला जिओ ‘दिवाली धमाका’ असं नाव दिलं आहे.

JIO च्या या प्लानची किंमत १६९९ रूपये आहे. या प्लानची मुदत १ वर्ष आहे. एका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल, यानुसार वर्षभर एकूण ५४७.५ जीबी डाटा मिळेल.

या प्लानमध्ये जिओ आपल्या यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर देत आहेत. अट अशी आहे की वर्षभरासाठी हा प्लान घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात. याचा उपयोग तुम्ही पुन्हा रिचार्जसाठी करू शकतात. कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणाऱ्या कूपन्सची मर्यादा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे. या कॅशबॅकचा वापर रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवर देखील करू शकतो. पण यासाठी युझर्सला कमीत कमी ५ हजार रूपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे.