Eco friendly bappa Competition
घर टेक-वेक इंटरनेटचा स्पीड होणार सुरफास्ट; Reliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी...

इंटरनेटचा स्पीड होणार सुरफास्ट; Reliance Jio तयार करतेय समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम

Subscribe

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची Reliance Jio कंपनी समुद्रात जगातील सर्वात मोठी केबल सिस्टम तयार करत आहे. कंपनीने एका अधिकृत निवेदनात यासंदर्भातली माहिती दिली. भारतातील डेटाच्या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी नेक्स्ट जनरेशनच्या दोन केबल जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प अनेक जागतिक कंपन्यांच्या भागीदारीने पूर्ण होईल आणि केबल पुरवठ्यासाठी जगभरातील नावाजलेल्या कंपन्या आणि सबमरीन केबल पुरवठादार सबकॉमबरोबर करारही करण्यात आला असून यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.

भारत-आशिया एक्सप्रेस (IAX) आणि भारत युरोप एक्सप्रेस (IEX) अशा दोन कंपन्या मदत करणार आहेत. भारत-आशिया एक्सप्रेस (IAX) सिस्टम सिंगापूर आणि त्यापलिकडे जोडणार आहे तर भारत युरोप एक्सप्रेस भारत मध्य पूर्व आणि युरोपला जोडणार आहे. आयएएक्स २०२३ च्या मध्यापर्यंत सेवेसाठी तयार होईल अशी अपेक्षा आहे, तर आयएक्स २०२४ च्या सुरुवातीस सेवेसाठी तयार होईल.

- Advertisement -

फायबर ऑप्टिक सबमरीन टेलिकॉमच्या इतिहासात प्रथमच या प्रणालीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा नकाशा समोर आलाय. दोन्ही केबल सिस्टीम १६,००० किमीपेक्षा जास्त श्रेणीमध्ये कार्यरत असतील आणि त्या प्रदेशात उच्च गती क्षमता देतील. आयएक्स आणि आयईएक्सकडून २०० टीबीपीएसपेक्षा जास्त क्षमता वितरीत करणे अपेक्षित आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमेन म्हणाले की, डिजिटल सेवा आणि डेटा वापरात भारताच्या नेत्रदीपक वाढीसाठी जिओ हा अग्रणी आहे. ते म्हणाले की, स्ट्रीमिंग व्हिडिओ, रिमोट वर्कफोर्स, 5G, आयओटी आणि त्याही पलीकडे, जिओ आपल्या प्रकारची पहिली भारत-केंद्रित आयएएक्स आणि आयएक्स उपप्रणाली तयार करण्यात मोठी भूमिका बजावत आहे, असं ते म्हणाले.

 

- Advertisement -
- Advertisement -
Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -