घरटेक-वेकजिओचा नवीन धमाकेदार प्लॅन; वर्षभर मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा!

जिओचा नवीन धमाकेदार प्लॅन; वर्षभर मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा!

Subscribe

रिलायन्स जिओ सध्या आपल्या युजर्ससाठी नवीनवीन प्लॅन आणत आहेत. अधिक चांगल्या कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा युजर्सना पुरवण्यासाठी नवीन प्लॅन जारी करत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीतले जास्त कालावधीचे प्लॅन मिळतील. तसेच यामध्ये हाय स्पीड इंटरनेटसह अनेक सुविधा प्रदान केल्या जातील. आज तुम्हाला रिलायन्स जिओच्या एका अशा प्लॅनबदल सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय हाय स्पीड इंटनेटरची सुविधा देखील दिली जाईल. त्यामुळे आज आपण हा नेमका काय प्लॅन आहे? याची किंमती आणि याचे मिळणारे नेमके फायदे काय आहेत? ते जाणून घेऊया.

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी ७४९ रुपयांचा प्लॅन जारी केला आहे. हा कंपनीचा प्रीपेड प्लॅन असून याची ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. म्हणजे युजर्स एकदाच रिचार्ज केल्यानंतर वर्षभरापर्यंत या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा प्लॅन उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्लॅन फक्त जिओफोनच्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.

- Advertisement -

अनलिमिटेड कॉलिंगसह होणार अनेक फायदे

रिलायन्स जिओच्या ७४९ रुपयांच्या प्लॅन अंतर्गत एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ युजर्स घेऊन शकतील. जर तुमच्याकडे जिओ फोन असेल तर तुम्ही ७४९ रुपयांच्या या प्लॅनचा लाभ घेऊ शकाल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल व्यतिरिक्त २जीबी हाय स्पीड डेटा देखील मिळेल. म्हणजेच ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटी दरम्यान तुम्ही एकूण ६७२जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता. या प्लॅन घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईट आणि रिटेल स्टोअरवर जाऊ शकता. याशिवाय प्लॅनसह युजर्सना JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.


हेही वाचा – भारतात सॅमसंगचे Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोन लाँच

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -