Reliance Jio Prepaid Plans: जाणून घ्या जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनबाबत, ज्याच्यासोबत मिळेल Jio BOGO Offer

Reliance Jio Prepaid Plans 75 plan with jio bogo offer get 56 days validity and 6gb data know details
Reliance Jio Prepaid Plans: जाणून घ्या जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनबाबत, ज्याच्यासोबत मिळेल Jio BOGO Offer

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) जवळ आपल्या प्रीपेड (Prepaid) युजर्ससाठी अनेक स्वस्त प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एका प्लॅनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ८० रुपयांपेक्षा कमी किंमतच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी ५६ दिवसांची असून ज्याच्यासोबत तुम्हाला Jio BOGO Offer दिली जाईल. या प्लॅनसोबत मिळणारे फायदे काय आहेत? वाचा

Jio Phone 75 Plan Details

या जिओ प्लॅनसोबत युजर्सना २८ दिवसांची व्हॅलिडिटीसह प्रतिदिन 0.1MB डाटासह 200MB एक्सट्रा डाटा मिळेल. म्हणजे हा प्लॅन एकूण ३ जीबी डाटा ऑफर करतो. शिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि ५० एसएमएस मिळतील.

परंतु अलीकडेच कंपनीने खास आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक खास Jio Offerसाठी Buy 1 Get 1 सुरू केले आहे. या जिओ ऑफर्स अंतर्गत युजरला एक रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यावर दुसरा त्याच किंमतीचा १ प्लॅन मोफत दिला जाईल. या अनुषंगाने जर एखादा युजर ७५ रुपयांचा प्लॅन घेतो तर त्याला २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत ७५ रुपयांचा अजून एक मोफत प्लॅन मिळेल, जो पहिल्या केलेल्या प्लॅनप्रमाणेच असेल. परंतु यासाठी तुम्हाला आपल्या जिओ नंबरवर मायजिओ अॅपमधून रिचार्ज करावा लागेल. अशा प्रकारे ७५ रुपयांमध्ये युजर्सना ५६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि एकूण 3GB+3GB डाटा मिळेल. तसेच प्लॅनसोबत Jio Cinema, Jio News, Jio Tv, Jio Security, Jio Cloud सारख्या अॅप्सचे एक्सेस मोफत मिळेल.