खुशखबर! २०२१मध्ये जिओ 5G होणार भारतात लॉन्च

अंबानींनी ५जी सेवा अफोर्डेबल ठेवण्यावर लक्ष दिले आहे. त्यामुळे ५जी सेवा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले.

reliance jio to launch 5g network in second half of 2021 says mukesh ambani
खुशखबर! २०२१मध्ये जिओ 5G होणार भारतात लॉन्च

रिलायन्स जीओची ५जी सेवा २०२१च्या मध्यावर लॉन्च करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रिचे चेअरमन आणि मॅनेजर डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सांगितले. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भारताचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी देशात ५जी सेवांचा उदय झाला आहे. देशात २०२१च्या मध्यापर्यत देशात ५ जी सेवा येणार सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२०च्या सभेत जिओ ५जीची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. भारतात डिजिटल परिवर्तनासाठी जिओ ५जीचे कायमस्वरूपी योगदान असणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

५जी सेवा लवकरात लवकर रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ५जीच्या पॉलिसी लेवलवर काम करण्याचेही त्यांनी सांगितले आहे. अंबानींनी ५जी सेवा अफोर्डेबल ठेवण्यावर लक्ष दिले आहे. ग्राहकांना परडवणाऱ्या दरात जियो ५जी सेवा देण्याचा अंबानींचा प्रयत्न आहे जेणेकरून ५जी सेवा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले. मुकेश अंबानी यांनी असे आश्वासन दिले आहे, की रिलायन्स जिओचे हे ५जी नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील हार्डवेअर आणि टेक्नलॉजी भारत सरकारच्या निर्देशानुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५जी नेटवर्क हे आत्मरिर्भर भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल असे ते म्हणाले.

मुकेश अंबानी यांनी असे सांगितले की, टेलिकॉम सेक्टरसाठी एका पॉलिसीची गरज आहे. ज्यामुळे देशातील ३०० मिलियन २जी नेटवर्क वापरणाऱ्या युजर्सना ४जीमध्ये शिफ्ट करता येईल. त्यामुळे २जी स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सनाही डिजिटल ट्रान्सफरचा फायदा होईल. या क्षणी भारत हा जगातील डिजिटल कनेक्टिवीटी असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे. परंतु आजही देशातील अनेक लोक हे २जी सेवा वापरत आहेत. त्यामुळे यासाठी एका नव्या पॉलिसीची गरज असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. त्याचबरोबर ५जी सेवा लककरात लवकर रोलआउट करणे ही गरजेचे आहे. मुकेश अंबानी यांच्या मते, भारत देश हा सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य केंद्र बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे.


हेही वाचा – आता १०० लोकांसोबत पहाता येणार अमेझॉन प्राइम व्हिडिओ