घरटेक-वेकआता Jio युजर्सना Whatsapp वरून करता येणार सर्व प्रकारचे रिचार्ज! वाचा सविस्तर

आता Jio युजर्सना Whatsapp वरून करता येणार सर्व प्रकारचे रिचार्ज! वाचा सविस्तर

Subscribe

नुकतीच रिलायन्स जिओने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याच्या मदतीने जिओ युजर्सना रिचार्ज करणे अधिक सोपे होणार आहे. अशा परिस्थितीत आता जिओ यूजर्स थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून रिचार्ज करू शकणार आहे. यासह, तुम्ही पेमेंट आणि इतर सुविधांचा आनंद देखील घेऊ शकतात. याशिवाय रिचार्जशी संबंधित सर्व प्रकारच्या सुविधांचा आनंद तुम्हाला या माध्यमातून घेता येणं शक्य होणार आहे. जिओने व्हॉट्सअ‍ॅपवर इंटीग्रेड केले आहे, जेणेकरून सर्वात नवीन उपक्रम ग्राहकांना लवकर उपलब्ध होऊ शकतील. सध्या सामान्यत: प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप असते. तसेच जियो फायबर, जिओमार्ट वॉट्सअ‍ॅपवरूनही एक्सेस करता येणं शक्य होणार आहे.

या नंबरवरून करता येणार रिचार्ज

जर व्हॉट्सअ‍ॅपवरून जिओ सिम रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या मोबाइल फोनमध्ये 70007 70007 हा नंबर सेव्ह करा. यासाठी युजर्सला फक्त 70007770007 या क्रमांकावर HI टाइप करून मेसेज पाठवावा लागणार आहे. यानंतर रिचार्जची प्रक्रिया समोर दिसू लागेल. यानंतर ई-वॉलेट, यूपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्ससारखे सर्व प्रकारचे पेमेंट पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवरून सर्व प्रकारच्या पेमेंटसाठी उपलब्ध असल्याचे युजर्सना दिसू लागेल आणि युजर्सना सोप्या पद्धतीने रिचार्ज करता येणार आहे.

युजर्सना मिळणार या सुविधा

  • ग्राहक WhatsApp वर jio SIM रिचार्ज करू शकतील.
  • WhatsApp वरून नवीन जिओ सिम तसेच पोर्ट-इन (MNP) करता येणार आहे
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना जिओ सिमचा सपोर्ट मिळू शकेल.
  • JioFiber संदर्भात ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरुन सपोर्ट मिळू शकेल.
  • व्हाट्सएपवरून जिओच्या इंटरनेट रोमिंगला सपोर्ट केले जाईल.
  • ग्राहकांना JioMart चे सपोर्ट मिळेल.
  • व्हॉट्स अॅपच्या मदतीने जिओ यूजर्सना एकाधिक भाषांचा सपोर्ट मिळेल. सुरुवातीला ही सुविधा हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध असणार आहे, यानंतर, इतर भाषांमध्ये या सुविधेचा आनंद घेता येईल.

Hyundai च्या नव्या Alcazar SUV कारचं बुकिंग सुरू; जाणून घ्या अनोखे फीचर्स

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -