घरटेक-वेकजिओची ग्राहकांना नवी ऑफर...

जिओची ग्राहकांना नवी ऑफर…

Subscribe

जिओ कंपनीने २०१७ मध्ये ग्राहकांसाठी दिड हजाराच्या किमतीत 4G फोन लाँच केला होता. यानंतर आता एक नवा 4G स्मार्टफोन लाँच करत आहे.

रिलायन्स जिओ लवकरच पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर घेऊन येणार आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानूसार जिओ कंपनी आता एक नवा 4G स्मार्टफोन घेऊन येत आहे. जिओने सबस्क्राइबर्स वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. मागील वर्षी झालेल्या वार्षिक सभेत जिओने आपला सबस्क्राइबर्सचा आकडा ५० कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. हा फोन कमी किमतीत असल्याचे सांगितले जात आहे.

लक्ष्य गाठण्यासाठी 4G फोन बाजारात

जिओचा हा फोन बाजारात आल्यास जे ग्राहक 2G चा वापरत करत आहेत ते सवलतीच्या दरात 4G फोन वापरू शकणार येणार आहेत. यामुळे जिओ कंपनी आपले लक्ष्य गाठण्यासाठी एक स्वस्तातील 4G फोन आणणार आहे. जिओचे सध्याच्या सबस्क्राइबर्सचा आकडा ३७.५ कोटी इतका आहे. तर इतर कंपन्यांचे ५० कोटीहून अधिक 2G युजर्स आहेत. त्यामुळे आपल्या सबस्क्राइबर्सचा आकडा वाढवणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे.

- Advertisement -

सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच

जिओ कंपनीने २०१७ मध्ये ग्राहकांसाठी दीड हजाराच्या किमतीत 4G फोन लाँच केला होता. यानंतर आता एक नवा 4G स्मार्टफोन लाँच करत आहे. जिओ कंपनी जरी स्वस्त स्मार्टफोन लाँच करत असेल तरीही यात कोणकोणते फिचर्स खास असणार आहेत हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या १०० कोटींपर्यंत आहे. यातले ५५ कोटी युजर्स हे 2G किंवा 3G फोन वापरणारे आहेत आणि जिओ कंपनी सुरूवातीपासूनच ग्राहकांना 4G सेवा देते. त्यामुळे आता जिओचा हा नवा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरतो काय? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


हेही वाचा – गुगल, फेसबुक, ट्विटर पाकिस्तानमधून होणार ‘साईन आऊट’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -