घरटेक-वेकस्टायलिश, दमदार फिचर्सवाली Renault Kiger लाँच; किंमत सर्वसामान्यांना परवडणारी

स्टायलिश, दमदार फिचर्सवाली Renault Kiger लाँच; किंमत सर्वसामान्यांना परवडणारी

Subscribe

फ्रान्सची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी रेनोने (Renault India) आज भारतात नवीन किजर कारचं (Renault Kiger) अनावरण केलं. Renault Kiger ही B-SUV लेटेस्ट एसयूव्ही कार आहे. ही कार फ्रान्स आणि भारताच्या कॉर्पोरेट डिझाईन टीमने संयुक्तपणे तयार केली आहे. रेनॉल्ट किजर रेनो ग्रुपची तिसरी ग्लोबल कार असेल, जी पहिल्यांदा भारतात लाँच झाली. त्यानंतर इतर देशांमध्ये लाँच होणार आहे. रेनॉल्ट किजर ही B-SUV सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे.

Kiger B-SUV CMFA+ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जो ट्रायबरमध्ये वापरला जातो. रेनॉल्ट किजर भारतीय बाजारात Maruti Suzuki Vitara Brezza, Toyota Urban Cruiser, Mahindra XUV 300, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue आणि Ford EcoSport शी स्पर्धा करेल.

- Advertisement -

इंजिन आणि ट्रान्समिशन

Renault Kiger मध्ये 1.0 लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क तयार करते. 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन तसेच मानक आहे. एएमटीकडे सीव्हीटी ट्रान्समिशन पर्यायसुद्धा उपलब्ध असतील. रेनॉल्ट कैगरमध्ये मल्टीसेन्स ड्राइव्ह मोड वैशिष्ट्य आहे. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडमध्ये कार चालविली जाऊ शकते.

इंटीरियर

किजरच्या आत वायरलेस स्मार्टफोन रेप्लिकेशन, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पीएम 2.5 क्लीन एअर फिल्टर, Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करणारा 20.32 सेमी फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लोटिंग रूफटॉप, ARKAMYS 3D साउंड सिस्टम, स्टीयरिंग फीचर्स ज्यात माउंटन कंट्रोल्स, इंजिन स्टार्ट/ स्टॉप बटण म्हणजे की लेस एक्सेस, व्हॉइस रिकग्निशन, क्रूझ कंट्रोल दिले आहेत.

- Advertisement -

एक्सटीरियर

एक्सटीरियरविषयी बोलायचं झालं तर रेनो Renault Kiger मध्ये 205 mm ग्राउंड क्लीयरन्स, क्रोम फ्रंट ग्रिल, LED DRLs, LED हेडलॅम्प्स, स्किड प्लेट, सी आकार सिग्नेचर एलईडी टेल लाईट, डायमंड कट अ‍ॅलोय व्हील्स, स्पोर्टी रीअर स्पॉयलर अशी वैशिष्ट्ये आहेत. मुख्य हेडलॅम्प क्लस्टर फ्रंट बम्परवर खाली देण्यात आली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -