घरटेक-वेकआरोग्य सेतू App अवघ्या ४५ दिवसांत १३ कोटी भारतीयांनी केला डाऊनलोड!

आरोग्य सेतू App अवघ्या ४५ दिवसांत १३ कोटी भारतीयांनी केला डाऊनलोड!

Subscribe

कोरोना विषाणूच्या लढ्यात आरोग्य सेतू अॅप भारतीयांची ढाल बनत आहे. २ एप्रिल रोजी हा अॅप लाँच झाल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांत हा अॅप १३ कोटी भारतीयांचं सुरक्षा कवच बनलं आहे. जास्तीत जास्त भारतीय नागरिक हा अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करत आहेत. फक्त या अॅपमुळे कोरोना संक्रमणाचे अलर्ट मिळत नसून आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने देखील परीक्षण केले जाते. लोकप्रिय झालेल्या हा अॅप जगातल्या लोकप्रिय अॅप्सच्या यादीत सामील झाला आहे. या अॅप्सच्या यादीत कमी वेळेत लोकप्रिय झालेले अॅप्स आहे. याचा सर्वात जास्त फायदा लोकांपेक्षा सरकारला होत आहे. या अॅपच्या मदतीने आजारी आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचता येत आहे.

नागरिकांमध्ये जागरूकता आणि संक्रमित व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा अॅप २ एप्रिल रोजी लाँच केला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलला सर्व भारतीय नागरिकांना हा अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. मग या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या पाच ते १० दिवसांत पाच कोटी लोकांनी हा अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केला.

- Advertisement -

एनआयटीआय आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिफोनला ७५ वर्ष लागले होते. तर रेडिओ सारख्या लोकप्रिय माध्यमाला जवळपास ३८ वर्ष लागले होते. तसेच टेलिव्हिजनला या प्रवासासाठी १३ वर्ष लागले होते. तर पोकेमॉन गो सारख्या गेमला १९ दिवस लागले. पण आरोग्य सेतू अॅपने अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केले. आता आरोग्य सेतू अॅप १३ कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे.


हेही वाचा – चीनला पहिला झटका; ‘ओप्पो’ कंपनीला स्मार्टफोन लाँच कार्यक्रम करावा लागला रद्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -