भारतीयांच्या आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या स्कॅन कॉपीची इंटरनेटवर विक्री

aadhar card, pan card and passport

भारतीयांच्या एक लाख ओळखपत्रांच्या स्कॅन प्रती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट सारख्या ओळखपत्रांचा समावेश आहे. सायबर इंटेलिजेंसशी संबंधित कंपनी सायबलने (Cyble) बुधवारी ही माहिती दिली. कंपनीचं म्हणणं आहे की हा डेटा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून नव्हे तर तृतीय पक्षाकडून लीक झाला आहे. सायबलने म्हटलं आहे की, “एका अभिनेत्याशी आमचा संपर्क झाला जो फारसा लोकप्रिय नाही. तो डार्क नेटवर एक लाखाहून अधिक भारतीय ओळखपत्रांची विक्री करीत आहे. त्या व्यक्तीची प्रतिष्ठा इतकी नाही की आम्ही त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ, परंतु त्याने सामायिक केलेला नमुना आणि त्याचा आकार यामुळे आम्ही या प्रकरणात लक्ष घातलं. या अभिनेत्याकडे भारताच्या विविध भागातील जवळपास एक लाख ओळखपत्रांचा अक्सेस आहे.

सायबर गुन्हेगारांद्वारे लीक केलेला वैयक्तिक डेटा फसवणूकीसाठी वापरला जातो. सायबलच्या संशोधकांना विक्रेत्याकडून एक हजार ओळखपत्रे मिळाली आहेत आणि स्कॅन केलेली ओळखपत्रे फक्त भारतीयांची आहेत. सायबलने म्हटलं आहे की, “प्राथम दर्शनी असं दिसून येतं आहे की हा डेटा तृतीय पक्षाने लीक केला आहे, कोणत्याही सरकारी यंत्रणेतून लीक झाल्याचे कोणतेही संकेत किंवा पुरावे नाहीत. सध्या कंपनीचे संशोधक अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही लवकरच याबाबत अपडेट देऊ.”


हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकित दोन महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांसाठी ‘एक देश एक बाजार’