Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Samsung Galaxy A12 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy A12 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Related Story

- Advertisement -

सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy A12 भारतात लाँच केला आहे. Galaxy A सीरिजचं हे लेटेस्ट मॉडेल आहे. Samsung Galaxy A12 च्या प्रमुख स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 15 वॅट फास्ट चार्जिंग आणि 128GB स्टोरेज देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए 12 वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉचसह आला आहे. याशिवाय त्यामध्ये तीन रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए 12 भारतीय बाजारात रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro), रियलमी 7 (Realme 7) आणि ओप्पो ए 52 (Oppo A52) सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए 12 ची किंमत, लाँच ऑफर्स

Samsung Galaxy A12 च्या 4GB + 64GB या व्हेरिएंट्सची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन काळ्या, निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पर्यायांसह आहे. या फोनची विक्री १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A12 स्पेसिफिकेशन

- Advertisement -

ड्युअल-सिम (नॅनो) सॅमसंग गॅलेक्सी ए 12 Android 10 आधारित वन UI कोर 2.5 वर काम करतं. यात 6.5 इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) टीएफटी डिस्प्ले आहे. मीडियाटेक हेलियो पी 35 चिपसेटसह सुसज्ज आहे. पोनला 4GB रॅम देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, गॅलेक्सी ए 12 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये एफ / 2.0 लेन्ससह 48-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा समावेश आहे. डेप्थ सेन्सर देखील देण्यात आला आहे.

 

- Advertisement -