घरटेक-वेकभारतात 'या' दिवशी लाँच होणार Samsung Galaxy F22; 48 MP कॅमेऱ्यासह मिळणार...

भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार Samsung Galaxy F22; 48 MP कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर

Subscribe

नुकताच Samsung च्या नवीन एम सीरीजमधील स्मार्टफोन Samsung Galaxy M22 चा एक लीक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की Samsung Galaxy M22 जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात येणार आहे. तर सॅमसंगने अधिकृतपणे घोषणा केली की Samsung Galaxy M22 हा स्मार्टफोन 6 जुलै रोजी भारतीय बाजारात लाँच केले जाईल. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून करण्यात येणार असून या फोनचा टीझरही फ्लिपकार्टवर लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 48 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याशिवाय 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. फोनमध्ये इतर कोणते फीचर्स आहेत, जाणून घ्या सविस्तर

असे असतील फीचर्स

Samsung Galaxy F22 स्मार्टफोन मध्ये 6.4 इंचाचा HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्जचा असल्याचे सांगितले जात आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. तसेच, हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आलं आहे.

- Advertisement -

असे असणार फीचर्स

या फोनच्या फोटोग्राफीबद्दल सांगायचे झाले तर, Samsung Galaxy F22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल, सेकेंडरी कॅमेराला 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सरसह 2 मेगापिक्सेल डीप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये पावरसाठी 6000mAh ची दरमदार बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी सारख्या फीचर्सचा उपयोग केला जाऊ शकतो. सॅमसंग हा फोन साधारण 15 हजार रुपयांच्या किंमतीसह लाँच होण्याची शक्यता सध्या भारतीय बाजारात वर्तवण्यात येत आहे.


येत्या काही महिन्यांत वेगाने होणार Delta variant चा फैलाव; WHO ने दिला इशारा

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -