घरटेक-वेकलॉकडाऊन काळात सॅमसंगचे हे दोन स्मार्टफोन झाले स्वस्त

लॉकडाऊन काळात सॅमसंगचे हे दोन स्मार्टफोन झाले स्वस्त

Subscribe

देश गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाऊन आहे. या दरम्यान, सॅमसंगने दोन स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर सर्व कंपन्यांचे स्मार्टफोन महाग झाले होते. सॅमसंगने गॅलेक्सी एम २१ आणि गॅलेक्सी ए५०एसची किंमत कमी केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M21 आणि गॅलेक्सी A50Sच्या नव्या किंमती

सॅमसंग गॅलेक्सी A50Sची किंमत २,४७१ रुपयांनी कमी झाली आहे तर गॅलेक्सी M21 १,०२३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. या वजावटीनंतर गॅलेक्सी M21 च्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १३,१९९ रुपये झाली आहे. तर गॅलेक्सी A50S ची किंमत १८,५९९ रुपये झाली आहे. नवीन किंमती सॅमसंगच्या साइटशिवाय अमेझॉनलाही लागू होतील.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी M21 स्पेसिफिकेशन

फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रिझोल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षण फोनमध्ये उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, गॅलेक्सी M21 ला Exynos 9611 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-G72 MP3 GPU मिळेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे, तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनला 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३.५ mm हेडफोन जॅक आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. गॅलेक्सी M21 मध्ये ६००० एमएएच बॅटरी आहे जी 15 वॅटचा वेगवान चार्जरला सपोर्ट करते. फोनचे वजन १८८ ग्रॅम आहे.


हेही वाचा – शाओमीचा Mi Note 10 Lite लाँच; जाणून घ्या फिचर्स

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी A50S चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी A50S मध्ये ६.४ इंचाचा एफएचडी प्लस सुपर एमोल्ड इनफिनिटी यू डिस्प्ले मिळेल. ज्याचा रिझोल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. यासह डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा उपलब्ध आहे. त्याच वेळी, उत्कृष्ट कामगिरीसाठी कंपनीने या फोनमध्ये Exynos ९६१० चिपसेट प्रोसेसर आहे. स्टोरेजच्या बाबतीत, ग्राहकांना ४ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. कॅमेर्‍याबद्दल बोलायचं झालं तर गॅलेक्सी A50S च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल आणि ५ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर असेल. दुसरीकडे कंपनीने सेल्फी प्रेमींसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने 4G VoLTE, जीपीएस, वाय-फाय आणि यूएसबी पोर्ट सी सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. याशिवाय गॅलेक्सी A50S ची बॅटरी 4000mAh आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -