घरटेक-वेकSamsung चा 'हा' स्मार्टफोन २२ हजारांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन २२ हजारांनी झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

Subscribe

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याच्या ऑफरची तुम्ही वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सॅमसंग कंपनीचा Samsung Galaxy Note 20 आता स्वस्त झाला आहे. Samsung Galaxy Note 20 च्या नवीन किंमती अॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाइटवर तुम्हाला जाणून घेता येईल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Samsung Galaxy Note 20 लाँच झाला होता.

या फोनची नवीन किंमत आता ऑनलाइन स्टोअरवर 54,999 रुपये आणि ऑफलाइन स्टोअरवर 59,999 रुपयांवर गेली असून या फोनच्या किंमतीत 22,000 रुपयांची कमी झाल्याचे सांगितले जात आहे. जर तुम्ही Samsung Galaxy Note 20 चे ब्लू व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला यासाठी 76,999 रुपये द्यावे लागतील. तर ब्राँझ आणि ग्रीन व्हेरिएंट नवीन किंमतीवर तुम्ही खरेदी करू शकतात.

- Advertisement -

असे आहेत स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy Note 20 फोनला 7.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्लेसह 60 Hz रीफ्रेश रेटसह एमोलेड देण्यात आला आहे. फोनमध्ये Exynos 990 प्रोसेसर आहे मात्र या फोनमध्ये युजर्सना 5 जी सपोर्ट मिळणार नाही. फोनला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला असून त्याची लेन्स 12 मेगापिक्सल आहे. जो ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस आहे, तर दुसर्‍या लेन्समध्ये 64 मेगापिक्सल आणि तिसरा लेन्स 12 मेगापिक्सलची देण्यात आली आहे. 30x स्पेस झूम फोनसह उपलब्ध असणार आहे. या फोनला सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जी, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, वायरलेस चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. यामध्ये 4300mAh बॅटरी आहे. ज्यामुळे हा फोन फास्ट चार्ज होण्यास मदत होते.


Pornographic Films Scandal: राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -