Samsungचा फोल्डेबल स्मॉर्टफोन ऑगस्ट महिन्यात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या किंमत

samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 या दोन्ही फोनची शिपिंग २७ ऑगस्ट पर्यंत सुरु होऊ शकते

Samsung Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 foldable smartphone is expected to launch in August, find out the price
Samsungचा फोल्डेबल स्मॉर्टफोन ऑगस्ट महिन्यात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या किंमत

Samsung आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच खास वैशिष्ट्ये असलेले स्मॉर्ट फोन आणत असतो. पुन्हा एकदा Samsung ने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा फोन आणला आहे. Samsung त्यांचे दोन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 हे दोन्ही फोन ऑगस्ट महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. (Samsung Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 foldable smartphone is expected to launch in August, find out the price)  यूट्यूबर John Prosser याने Samsungच्या या दोन्ही फोल्डेबल फोनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.  यूट्यूबर John Prosser दिलेल्या माहितीनुसार, samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 या दोन्ही फोनची शिपिंग २७ ऑगस्ट पर्यंत सुरु होऊ शकते त्याचप्रमाणे Galaxy वॉच ४ ही लाँच होण्याची शक्यता असल्याचे त्याने म्हटले आहे. या दोन्ही फोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. काय आहे या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Samsung Galaxy Z Fold 3

Samsung Galaxy Z Fold 3 फोन ब्लॅक,ग्रे आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये १२MPचा प्रायमरी लेंस, १२MPचा वाइड एंलग लेंस आणि १६ MPचा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा १६ MPचा देण्यात आला आहे.

Galaxy Z Flip 3

 

Galaxy Z Flip 3 हा फोन ब्लॅक,व्हाइट,पर्पल आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये युझर्सना मोठा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्मॉर्टफोन पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. जुन्या Galaxy Flip फोनमध्ये १.१ इंचाचा सेंकडरी डिस्प्ले देण्यात आला होता. त्याच्या तुलनेत या फोनमधील डिस्प्ले मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – जबरदस्त बॅटरी बॅकअप, 48 MP कॅमेरा असणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच