घरटेक-वेकजगातील नंबर वन कंपनी बनली Samsung, दुसऱ्या क्रमांकावर Apple तर तिसऱ्या क्रमांकावर...

जगातील नंबर वन कंपनी बनली Samsung, दुसऱ्या क्रमांकावर Apple तर तिसऱ्या क्रमांकावर आहे ‘ही’ कंपनी

Subscribe

सॅमसंग कंपनीची स्मॉर्टफोन मार्केटमध्ये २३ टक्के भागीदारी

ग्लोबल स्मॉर्टफोन शिपमेंटने जगभरातील नंबर नव स्मॉर्टफोन कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सॅमसंग या कंपनीने बाजी मारली आहे. सॅमसंग कंपनी जगातील नंबर वन  स्मॉर्टफोन कंपनी ठरली आहे. तर अॅपल कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाओमी ही कंपनी तिसऱ्या क्रमांवर आहे. हे आकडे २०२१च्या तिसऱ्या तिमाहीच्या रिसर्च फर्म काऊन्सलिंगकडून जारी करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्लोबल स्मॉर्टफोन शिपमेंटमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट चिपच्या कमतरेमुळे झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चिप तयार करणाऱ्या कंपन्यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्मॉर्टफोन्सच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

२०२१च्या तिसऱ्या तिमाहीत स्मॉर्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग कंपनीने २३ टक्के भागीदारी करत पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. तर  अॅपल कंपनीची १५ टक्के भागीदारी आहे. तर शाओमी कंपनीची १४ टक्के भागीदारी आहे. या तीन कंपन्या वगळता विवो कंपनी १० टक्क्यांच्या भागीदारीसह चौथ्या क्रमांकावर आणि ओप्पो कंपनी पाचव्या क्रमांकावर आहे. ओप्पोची देखील १० टक्के भागीदारी सध्या स्मॉर्टफोन माक्रेटमध्ये आहे.

- Advertisement -

समोर आलेल्या रिपोर्टनुसार,अॅपलच्या ५ जी सपोर्ट आयफोन्समुळे अॅपल कंपनीची दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयफोन १२ आणि आयफोन १३मध्ये कंपनीने ५ जी टेक्नोलॉजी दिली होती. या दोन मॉडेलची जागतिक स्तरावर मोठी विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. या आधीची स्मॉर्टफोन कंपन्यांची यादी पाहिली असता जून महिन्यात शाओमी कंपनी जगातील नंबर वन कंपनी ठरली होती. शाओमी सारखी कंपनी जागतिक स्तरावर नंबर वन यादीत येते ११वर्षातला इतिहास असल्याचे रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते.


हेही वाचा – video : Flipkart वर मागवला iPhone 12 मिळाला निरमा साबण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -