Samsung ला मोठा धक्का! Galaxy चा सोर्स कोर्डसह 190 GB डेटा हॅकर्सकडून लीक

samsung says hackers breached company data galaxy source code
Samsung ला मोठा धक्का! Galaxy चा सोर्स कोर्डसह 190 GB डेटा हॅकर्सकडून लीक

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला (Samsung Electronics Co.) आता एका मोठा धक्का बसला आहे. कारण सॅमसंगचा (Samsung) अंतर्गत डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, लीक झालेल्या डेटामध्ये गॅलेक्सी (Galaxy) स्मार्टफोनच्या ऑपरेशनचा सोर्स कोर्डचा देखील समावेश आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एका हॅकिंग ग्रुपने सॅमसंगचा डेटाचा एक्सेस गेन केल्यानंतर कंपनीने याबद्दल एक विधान जारी केले. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या हॅकर ग्रुपने काही वेळापूर्वी एनव्हीडियावरही (Nvidia) अटॅक केला होता.

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, यापुढे कोणतेही ब्रीचपासून वाचण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच कंपनीने पर्सनल डेटावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती दिली आहे. सॅमसंगने सांगितले की, कंपनीच्या काही अंतर्गत डेटामुळे सिक्युरिटी ब्रीच झाले आहे.

सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या सिक्युरिटी ब्रीचमध्ये गॅलेक्सी डिवायसच्या ऑपरेशनशी संबंधित काही सोर्ल कोड देखील होता. मात्र यातून कोणत्याही ग्राहक किंवा कर्मचाऱ्यांचा पर्सनल डेटा लीक झालेला नाही. यामुळे सध्या तरी याचा परिणाम सॅमसंगच्या व्यवसायावर किंवा ग्राहकांवर होणार नाही.

190GB साईजच्या फाईल झाल्या लीक

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सॅमसंग कंपनीकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. तसेच ग्राहकांना कोणत्याही अडचणींशिवाय निरंतर सेवा देत राहू असे कंपनीकडून सांगण्यात आले. या अहवालात असे म्हटले की, LAPSUS$ हॅकर ग्रुपने त्याच्या टेलीग्राम चॅनेलवर 190GB torrent file अपडेट केली आहे.

हॅकर ग्रुपने असा दावा केला की, फाइलमध्ये सॅमसंगचा कंफिडेंशियल सोर्स कोडचाही समावेश आहे ज्यामुळे कंपनीची डिव्हाइस सिक्युरिटी सिस्टम एक्सपोज झाली आहे. या लिस्टमधील आयटम्स Samsung स्मार्टफोन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि बूटलोडर सोर्सचे अल्गोरिदम आहेत, ज्याचा वापर काही ऑपरेटिंग सिस्टम कंट्रोल बायपास करण्यासाठी केला जाऊ शकतो.


महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, नितेश राणेंचा पलटवार