घरटेक-वेक'शनी'भोवती असलेल्या कडा होतील गायब ?

‘शनी’भोवती असलेल्या कडा होतील गायब ?

Subscribe

जेव्हा पासून आपण शनीग्रहाचा अभ्यास करायला घेतला आहे. त्या दिवसापासून आपण त्याभोवती कडा असल्याच्या पाहत आहोत. पण या कडा तयार कशा झाल्या असतील याचेही संशोधन सुरु आहे.

अंतराळातील ‘शनी’ या ग्रहाची ओळख ही त्याच्या भोवती असलेल्या कडयामुळे होते. इतर कोणत्याही ग्रहाला अशा कडा नाहीत. त्यामुळेच शनी ग्रह विशेष ठरतो. पण आता शनीवरील याच कडा धोक्यात आल्या आहेत. कारण या कडा शनीपासून दुरावत असून कालांतराने त्या गायबच होतील, अशी भिती नासाने व्यक्त केली आहे. या कडा कमी का होत आहेत ? याचा अभ्यास नासाचे शास्त्रज्ञ करत असून या मागील काही कारणे देखील त्यांनी शोधून काढली आहेत.

वाचा- अंतराळातून टिपला इनसाईट यानाचा फोटो

 काय आहेत कारणे?

शनी ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रामुळे या ग्रहावर बर्फाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या ग्रहाभोवती असलेल्या कडांमध्ये पाणी साचत आहे. हा पाऊस जास्त असून त्यामुळे ऑलिम्पिकमधील स्विमिंग पूल भरेल इतके पाणी प्रत्येक ३० मिनिटाला या रिंगमध्ये इतके पाणी साचत आहे. त्यामुळे या कडा पाण्याने भरत आहे. जर हा बर्फाचा पाऊस असाच पडत राहिला तर या कडा पाण्याखाली राहून गायबच होतील. साधारण १०० मिलियन वर्षांपर्यंतच या कडा राहू शकतील, असे नासाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा- पाहा मंगळावर काढलेला पहिला ‘सेल्फी’

शनीच्या कडा तयार झाल्या कशा ?

जेव्हा पासून आपण शनीग्रहाचा अभ्यास करायला घेतला आहे. त्या दिवसापासून आपण त्याभोवती कडा असल्याच्या पाहत आहोत. पण या कडा तयार कशा झाल्या असतील याचेही संशोधन सुरु आहे. शनी ग्रहाला आधीपासून कडा होत्या का? की त्या नंतर तयार झाल्या, असे प्रश्न देखील नासाने उपस्थित करत त्याचा शोध करायला घेतला आहे. अंतराळात असलेल्या अन्य काही ग्रहांभोवती देखील कडा आहेत. पण त्या इतक्या जाड नाहीत. त्यामुळे इतर ग्रहांवर असलेल्या कडादेखील अशाच काही कारणामुळे कमी झाल्या आहेत का ? याचा शोध देखील नासाने सुरु केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -