‘सिक्युरिटी चेक किया?’, गुगलचा युजर्सना सवाल

ऑनलाईन डेटा सुरक्षित ठेवण्यासठी गुगलकडून #SecurityCheckKiya ही विशेष मोहिम राबवली आहे.

#SecurityCheckKiya, Google asks its users

मागील काही महिन्यांपासून सातत्याने ऑनलाईन डेटाच्या असुरक्षितेतवर बोललं जात आहे. ऑनलाईन डेटा सुरक्षित नसल्याची अनेक उदाहरणंही आतापर्यंत समोर आली आहेत. त्यामुळे युजर्सना आपला ऑनलाईन डेटा सुरक्षित आहे की नाही? याची कायमच चिंता लागून राहिलेली असते. दरम्यान, याबाबत आता स्वत: गुगलनेच युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. डेटा सुरक्षित ठेवण्यासठी गुगलकडून #SecurityCheckKiya ही विशेष मोहिम राबवली आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत गुगलने डेटा सुरक्षित ठेवण्याबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आज जगभरात 

 

‘तुम्ही वापरत असलेल्या विवध अॅप्सना आणि तुमच्या मोबाईलला पासवर्ड ठेवा’, असा महत्वाचा सल्ला गुगलकडून युजर्सना देण्यात आला आहे. दिवसागणीक वाढत असलेल्या तंत्रज्ञानाने आपलं जगणं आणि काम करण्याच्या पद्धतीला प्रभावीत केलं आहे. इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणवार वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच इंटरनेटवर आपला डेटा सुरक्षित राहावा आणि त्यासाठी सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली असावी, अशी युजर्सची अपेक्षा असते. याच धर्तीवर ‘युजर्सचा ऑनलाईन डेटा सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करत आहोत’, अशी ग्वाही गुगल इंडियाच्या (ट्रस्ट अँड सेफ्टी) संचालिका सुनिता मोहंती यांनी दिली आहे.

मोहंती यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, ‘गुगलने नेहमीच त्याच्या सर्व सेवांबाबत सुरक्षितता बाळगली आहे. गुगल सातत्याने आणि स्वयंचलित पद्धतीने युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. मात्र, दुसरीकडे युजर्सनेसुद्धा ते अपलोड करत असलेल्या माहितीविषयी जागरुक राहणं आवश्यत आहे. विशेषत: तरुणवर्गाने आणि पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणाऱ्या युजर्सनी याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.’ दरम्यान, आपला डेटा सुरक्षित ठेवण्याबाबत युजर्सना गुगलकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.