घरटेक-वेककोणाचं काय तर कोणाचं काय ! जावयाची गाढवावरून धिंड काढत होळीचं सेलिब्रेशन

कोणाचं काय तर कोणाचं काय ! जावयाची गाढवावरून धिंड काढत होळीचं सेलिब्रेशन

Subscribe

बीडमध्ये गावातील नवीन लग्न झालेल्या जावयाला गाढवावर बसून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. गाढवावर बसलेल्या जावयाला पाहण्यासाठी गावातील लोक एकत्र जमतात.

सध्या सर्वत्र होळीचा माहोल आहे. होळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक ठिकाणी होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. प्रत्येक ठिकाणी अनोख्या प्रकारे होळी खेळली जाते. परंतु महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात साजरी केली जाणारी होळीची अनोखी परंपरा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. बीडमध्ये गावातील नवीन लग्न झालेल्या जावयाला गाढवावर बसून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. गाढवावर बसलेल्या जावयाला पाहण्यासाठी गावातील लोक एकत्र जमतात. अशाप्रकारे होळी साजरी करुन गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढल्यानंतर जावयाला सोन्याची अगंठी आणि नवे कपडे भेट देऊन जावयाचा मानपान केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील विडा येवता गावात जवळपास ८० वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. गावात कोण नवा जावई आहे हे शोधण्यासाठी २-३ दिवस लागतात. गावातील ही अनोखी परंपरा पाहून अनेक जावई होळीच्या काही दिवस आधी गाव सोडून जातात किंवा गावातच कुठेतरी लपून बसतात. गावातील नव्या जावयांवर गावकरी बारीक लक्ष ठेवून असतात. होळीच्या आधी जावई कुठे जाऊ नये सतत त्याचा पाठलाग करतात.

- Advertisement -

विडा येवता गावातील अनंतराव ठाकूर देशमुख सांगतात, जवळपास ८ दशकांहून अधिक काळापासून गावात ही परंपरा आहे. होळीच्या दिवशी अनंतराव देशमुख यांचा जावई होळी खेळायला तयार नव्हता. त्याच्यासाठी एक गाढव सजवून तयार केला होता. शेवटी जावयाला तयार करुन देशमुखांनी त्याची गावभर मिरवणूक काढलीच. अशाच प्रकारे घटना घडत गेल्या आणि गावातील ही परंपरा पुढे टिकून राहिली.


हेही वाचा – Happy Holi 2022 : केवळ भारतातच नाही तर जगातील या 8 देशांमध्येही होते ‘होळी’चे सेलिब्रेशन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -