घरटेक-वेकसोनीचा भन्नाट मोबाईल 'प्रोजेक्टर' !

सोनीचा भन्नाट मोबाईल ‘प्रोजेक्टर’ !

Subscribe

येत्या ३ ऑगस्टपासून हा प्रोजेक्टर इंडियन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

मोबाईल किंवा लॅपटॉपवरील प्रेझेंटेशन मोठ्या पडद्यावर प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्टरची गरज असते. या कामासाठी विविध कंपन्यांचे प्रोजेक्टरही उपलब्ध असतात. मात्र, बरेचदा कामानिमित्त प्रवास करतेवेळी ते भलेमोठे प्रोजेक्टर्स सोबत घेऊन जाणं अवघड आणि जोखमीचं होऊन जातं. मात्र, आता ही समस्या नक्कीच दूर होणार आहे. गॅजेट निर्मीतीच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सोनी कंपनीने एक नवीन भन्नाट गॅजेट लाँट केलं आहे. सोनी कंपनीने नुकतंच ‘एमपीसीडी १’ (Mpcd) हा मोबाईल प्रोजेक्टर लाँच केला आहे. विशेष म्हणजे आटोपशीर आकाराचा हा प्रोजेक्टर पोर्टेबल आहे. सोनीने इंडियन मार्केटमध्ये हा पोर्टेबल प्रोजेक्टर विक्रीसाठी लाँच केला असून, या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये अनेक उत्तम फीचर्स सामावलेले आहेत. दरम्यान या प्रोजेक्टरची किंमत २९ हजार ९९० रुपये असून, येत्या ३ ऑगस्टपासून तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Sony-MP-CD1

MP-CD1 प्रोजेक्टरचे फीचर्स

  • आटोपशीर आकार आणि हलक्या वजनामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सहज शक्य
  • ५ हजार मिलिअॅँपिअर क्षमतेची पॉवरफुल बॅटरी. त्यामुळे सलग २-३ तास प्रोजेक्शन चालू ठेवण्याची क्षमता
  • ट्रायपॉडला जोडता यावं खास सॉकेट सपोर्टची सुविधा
  • वायरलेस कनेक्टिव्हीटीची देखील सोय
  • क्रोमकास्टसारख्या डोंगलच्या माध्यमातून स्ट्रीमिंग करण्याची सुविधा
  • युएसबी टाईप सी, मायक्रो-युएसबी आणि एचडीएमआय युएसबी सपोर्ट उपलब्ध
  • ८५४ बाय ४८० पिक्सल्सच्या आणि १२० इंच आकारमानाच्या व्हिडिओचे प्रोजेक्शन करण्याची क्षमता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -