घरटेक-वेकअवघ्या ५०० रुपयांच्या गुंतवणुकीने करा सुरुवात, तुम्हीही व्हा करोडपती

अवघ्या ५०० रुपयांच्या गुंतवणुकीने करा सुरुवात, तुम्हीही व्हा करोडपती

Subscribe

भविष्यात चांगले रिटर्न मिळण्यासाठी आर्थिक सल्लागारही गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला

भविष्यात घर,गाडी, मुले,संसार,लग्नकार्य करायचे असले तर त्यासाठी आधी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूकीची सुरुवात करण्यासाठी कोणत्याही मोठ्या रक्कमेची गरज नाही. एखाद्या छोट्या रकमेनेही तुम्ही पैशात गुंतवणूक करु शकता. गुंतवणूकीसाठी बरेच जण वेळ घेतात. गुंतवणूक करणे काही जाणांना तितके महत्त्वाचे वाटत नाही. तर बरेच जण असे आहेत की ज्यांना गुंतवणूक करायाची आहे पण त्याची सुरुवात कुठून करायची? आपले पैसै सुरक्षित राहतील का?  असे अनेक प्रश्न असतात. गुंतवणूकीसाठी सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे म्युचुअल फंड (mutual Fund) भविष्यात चांगले रिटर्न मिळण्यासाठी आर्थिक सल्लागारही गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. म्युचुअल फंडमध्ये कोणत्याही वयाच्या व्यक्ती आपली गुंतवणूक करु शकतात. जितक्या कमी वयात गुंतवणूक सुरु कराल तितक्या लवकर त्याचा फायदा मिळवता येतो. बँकेत सतत घट होणाऱ्या व्याजापेक्षा म्युच्युअल फंड हे एक सोप्पे माध्यम आहे. म्युच्युअल फंडमध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते. ते कसे जाणून घ्या. (Start with investment of just Rs 500 in mutual Fund,become a millionaire yourself)

म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला मार्ग म्हणजे म्युचुअल फंड एजेंट. दुसरा पर्याय म्हणजे ब्रोकरकडून ऑनलाइन ट्रेडिंग अकाउंट खोलून SIP (Systematic Investment Plan) करु शकता. याव्यतिरिक्त म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे. त्याचबरोबर म्युचुअल फंडाच्या कंपनी वेबसाइडवर जाऊनही तुम्ही गुंतवणूक करु शकता. Systematic Investment Plan द्वारे गुंतवणूक केल्याने भविष्यात चांगले रिटर्स मिळतात. SIPच्या माध्यमातून डायवर्सिफाइड म्युचुअल फंडातही गुंतवणूक करता येते. केवळ ५०० रुपये महिना भरुन तुम्ही गुंतवणूकीला सुरुवात करु शकता.

- Advertisement -

२५ वर्षांच्या तरुणाने महिन्याला ५०० रुपये म्युचुअल फंडाने गुंतवणूक सुरु केली तर त्याला दर सहा महिन्यांनी त्यांच्या गुंतवणूकीची किंमत ५०० रुपयांनी वाढवली पाहिजे. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याआधी एखाद्या आर्थिक सल्लागाराची चर्चा करा.


हेही वाचा – Amazon Primeच्या ग्राहकांना मिळणार अर्ध्या किंमतीत सबस्क्रिप्शन

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -