घरटेक-वेकFacebook Trick: फेसुबकवरून तुमचा डाटा होतोय शेअर? तर याला कसे रोखाल?

Facebook Trick: फेसुबकवरून तुमचा डाटा होतोय शेअर? तर याला कसे रोखाल?

Subscribe

प्रत्येकाला स्वतःचा वैयक्तिक डाटा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो जपून ठेवण्यासाठी अनेक Appsचा वापर केला जातो. पण तरीही आपला वैयक्तिक डाटा लीक होतो. मध्यंतरी डाटा शेअरिंगवरून Whatsappची नवी पॉलिसी आणि फेसुबक-Appleचा वाद चांगलाचं चर्चेत राहिला. अलीकडेच Appleने प्रदर्शित केलेल्या नव्या अपडेटमध्ये एक फिचर Add केले. ज्याद्वारे कोणीही सहजरित्या आपला डाटा घेऊ शकत नाही. परंतु अँड्रॉईड यूजर्ससाठी आतापर्यंत कोणतेही असे फिचर आले नाही आहे. पण फेसबुकमधील एका खास फिचरच्या मदतीने आपला डाटा घेण्यास मनाई करू शकता.

गेल्या वर्षी सोशल मीडिया जाएंट फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक टूल जारी केले होते. ज्याद्वारे युजर्स त्याच्या डाटा कोणत्या वेबसाईटने किंवा थर्ड पार्टी Appsद्वारे घेतला जात आहे, हे ओळखले जाऊ शकते. या टूलचे नाव Off-Facebook Activity असे आहे. या टूलच्या माध्यमातून तुम्ही डाटा शेअरिंगवर लगाम लावू शकता. जाणून घ्या हे कसे केले जाते.

  • यासाठी सर्वात पहिल्यांदा फेसबुक अकाउंट लाँगिन करा.
  • मग वरती उजव्या बाजूला दिलेल्या तीन लाईन्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर Setting & Privacy वर क्लिक करा.
  • एवढे झाल्यानंतर Setting मध्ये जा आणि Off-Facebook Activityवर क्लिक करा.
  • तुमचा डाटा कोणत्या वेबसाईट किंवा थर्ड पार्टी Appsद्वारे एक्सेस केला जात आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर Manage your Off-Facebook Activity क्लिक करा.
  • इथे तुम्हाला वेरिफिकेशनसाठी पासवर्ड टाकावा लागेल.
  • इतके झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचं अकाउंट लिंक असलेल्या वेबसाईट आणि थर्ड पार्टी Appsची लिस्ट येईल.
  • जर तुम्ही सर्व वेबसाईट आणि थर्ड पार्टी Appsसाठी एकसाथ Off-Facebook Activityला डिसेबल करू इच्छित आहात. तर तुम्ही लिस्टच्या वरती असलेले क्लिअर हिस्ट्री (Clear History) क्लिक करू शकता. यामुळे तुमची लिस्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -