घरटेक-वेकट्विटरवर दर ३० सेकंदाला महिलांबाबत वापरले जातात अपशब्द

ट्विटरवर दर ३० सेकंदाला महिलांबाबत वापरले जातात अपशब्द

Subscribe

सोशल मीडियावर महिलांबाबत सर्रास अपशब्द वापरले जातात. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ट्विटरवरवर ३० सेकंदाला महिलांबाबत अपशब्द वापरले जातात.

मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हल्ली सोशल मीडियाचा वापर समान्या झाला आहे. दररोज लाखो करोडो युजर्स  सोशल मीडियावर आपले अकाऊंट बनवत असतात. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला ज्या भावना व्यक्त करायच्या असता त्यांना संधी देण्यासाठी सोशल मीडिया हा उत्तम मार्ग आहे. मात्र अनेकजण या माध्यमाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतानाचे दिसून आले आहे. सोशल मीडियापैकी एक प्रभावी माध्यम म्हणजेच ट्विटरवर महिलांना सर्वाधिक अपशब्द वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे. महिला पत्रकार आणि राजकारण्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असल्याचे दिसून आले आहे. दर ३० सेकंदाला या महिलांबाबत ट्विटरवर सर्रास अपशब्द वापरले जातात. महिलांना आदराचे स्थान देणाऱ्या समाजामध्ये अनेक फेक अकाऊंट्सद्वारे ही कामे केली जात असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

असे करण्यात आले सर्व्हेक्षण

मागील काही महिन्यांमध्ये ट्विटरवर केलेल्या ट्विटचे सर्व्हेक्षण करण्यात आले. मिळालेल्या माहिती नुसार ऑनलाइन हेटस्पीच आणि महिलांवर अश्लील कमेंटचे प्रमाण यात जास्त होते. मागील काही काळात १.१ दशलक्ष कमेंट ट्विटरवरून करण्यात आल्या आहेत. काही ट्विटर अकाऊंटमध्ये महिलांच्या लैंगिकतेवर अपशब्द वापरण्यात आले आहे. असे ३ लाख ट्विट समोर आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -